Padvidhar Election Voter Registration: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघ तसेच पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया (De-novo preparation of electoral rolls) सुरू झाली आहे. पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी वेळापत्रक | Padvidhar Election Voter Registration
अर्जाची अंतिम तारीख (प्रपत्र १८ व १९): ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. यानंतरही अर्ज सादर करण्याची मुभा असेल.
प्रारूप मतदार याद्या: २५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.
दावे व हरकती: २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत नागरिक प्रारूप यादीविषयी आपले दावे व हरकती सादर करू शकतात.
अंतिम मतदार याद्या: १० डिसेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून ३० डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
पदवीधर मतदारसंघात नोंदणी पात्रता निकष (Graduates’ Council Constituency)
- पदवीधर मतदारसंघात नोंदणी करण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- ती व्यक्ती सदर पदवीधर मतदारसंघाची सर्वसाधारण रहिवासी (ordinarily resident) असावी.
- दि. १-११-२०२५ पूर्वी किमान तीन वर्षे आधीपासून ती व्यक्ती भारतातील कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असावी किंवा तिच्याकडे त्यास समतुल्य पात्रता असावी.
- आवश्यक कागदपत्रांमध्ये रहिवाशाचा पुरावा आणि पदवी पात्रतेसाठी एक कागदपत्र (भारत निवडणूक आयोगाच्या ५ सप्टेंबर २०१६ च्या पत्रानुसार) सादर करणे आवश्यक आहे.
शिक्षक मतदारसंघात नोंदणी पात्रता निकष (Teachers’ Council Constituency)
- शिक्षक मतदारसंघात नोंदणी करण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- ती व्यक्ती सदर शिक्षक मतदारसंघाची सर्वसाधारण रहिवासी असावी.
- दि. १-११-२०२५ पूर्वीच्या सहा वर्षांच्या आत एकूण किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी, लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० च्या कलम २७(३)(ब) नुसार निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापनात गुंतलेली असावी.
- आवश्यक कागदपत्रांमध्ये रहिवाशाचा पुरावा आणि अध्यापनातील सहभाग सिद्ध करण्यासाठी शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी दिलेले प्रमाणपत्र (भारत निवडणूक आयोगाच्या ५ सप्टेंबर २०१६ च्या पत्रानुसार) सादर करणे आवश्यक आहे.
शिक्षक व पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी कोठे करायची?
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावेत. या सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या नोंदणी करणे शक्य झाले आहे.
विधानसभा/संसदीय मतदारसंघाचे तपशील: अर्जदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या पडताळणीसाठी, विधानसभा/संसदीय मतदारसंघातील विद्यमान तपशील भरणे आवश्यक आहे. नागरिक आपले नाव EPIC क्रमांक, किंवा नाव, नातेवाईकाचे नाव, वय आणि लिंग, किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे (नोंदणीकृत असल्यास) शोधू शकतात.
Padvidhar Election Voter Registration आणि शिक्षक मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, कागदपत्रे आणि संबंधित माहिती संकेतस्थळावरील “Manual” या विभागात पाहता येईल.
अधिक माहितीसाठी : माहिती पुस्तिका पाहा




