लाडकी बहीण योजना e-KYC संदर्भात 2 मोठे निर्णय!

By MarathiAlert Team

Published on:

राज्यातील महिलांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेसाठी असलेली Ladki Bahin Yojana Ekyc Last Date आता वाढवण्यात आली आहे. तसेच पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांसाठी महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लाडकी बहीण योजना e-KYC साठी या तारखेपर्यंत मुदतवाढ!

यापूर्वी लाडकी बहीण योजना e-KYC साठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत होती, पण नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती.

या गंभीर समस्येची दखल घेत, मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाने जाहीर केल्यानुसार, आता e-KYC करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana Ekyc Last Date)

या मुदतवाढीमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती असलेल्या लाखो भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने घेतलेल्या या संवेदनशील निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे.

ज्या महिलांनी अद्यापही e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेऊन लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी. ही Ladki Bahin Yojana Ekyc Last Date वाढल्याने पात्र महिलांना वेळेत लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

एकल लाभार्थी महिलांसाठी eKYC सुविधा उपलब्ध

ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत अथवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांसाठी सरकारने विशेष सूचना जारी केल्या आहेत, त्यांनी स्वतःचे e-KYC करावे.

यासोबतच, त्यांना त्यांच्या पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, तसेच घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.

योजनेचे स्वरूप आणि लाभ

राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे हा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी या योजनेस मान्यता दिली आहे.

पात्रता: महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळतो.

लाभ: या योजनेमार्फत पात्र महिलांना दरमहा रु. १,५००/- चा आर्थिक लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा करण्यात येतो.या महत्त्वपूर्ण मुदतवाढीमुळे, कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. Ladki Bahin Yojana Ekyc Last Date ची चिंता आता दूर झाली असून, ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अधिक माहितीसाठी : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!