अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ लवकरच नवीन पात्रता प्रमाणपत्र (Eligibility Certificate) देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती महामंडळाने एका प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
या प्रक्रियेत तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर, शक्य तितक्या लवकर अर्ज स्वीकारणे सुरू केले जाईल. दरम्यान, Annasaheb Patil Karj Yojana (अण्णासाहेब पाटील कर्ज योजना) अंतर्गत व्याज परतावा आणि बँक मंजुरी प्रकरणांचे कामकाज मात्र कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत सुरू आहे.
Annasaheb Patil Karj Yojana व्याज परतावा नियमित
पात्रता प्रमाणपत्राची प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती थांबवण्यात आली असली तरी, महामंडळाने स्पष्ट केले आहे की, लाभार्थ्यांना दिला जाणारा व्याज परतावा नियमितपणे वितरित केला जात आहे.
सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत होल्ड केलेली व स्थगित (ब्लॉक) केलेली प्रकरणे वगळता, व्याज परताव्यासाठी दावा केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. यामुळे Annasaheb Patil Karj Yojana चा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महामंडळाच्या निदर्शनास आले आहे की, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील काही एजंट आणि ट्रॅक्टर एजन्सी यांनी संगनमत करून एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेक प्रकरणे दाखल केली. यातील काही प्रकरणांमधील व्याज परताव्याची रक्कम एजंट्सनी स्वतःच्या खात्यावर घेतल्याचे उघड झाले.
या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी त्वरित कारवाईसाठी अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांना (SP) पत्र दिले. त्यानुसार, अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले असून, महामंडळ राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशा घटना घडल्या आहेत का, याची तपासणी करत आहे.
गैरव्यवहार टाळण्यासाठी नवीन सुरक्षा प्रणाली
पुढील गैरव्यवहार टाळण्यासाठी महामंडळ ‘खाते प्रमाणिकरण प्रणाली’ (Account Authentication System) लागू करत आहे.
एजंटमार्फत दाखल केलेली आणि ब्लॉक केलेली प्रकरणे ज्या लाभार्थ्यांची आहेत, त्यांनी त्यांच्या मूळ कागदपत्रांसह आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्हा समन्वयकांचे संपर्क क्रमांक महास्वयंम (https://udyog.mahaswayam.gov.in/) प्रणालीवर उपलब्ध आहेत.
यापुढे नागरी सुविधा केंद्र वगळता, अन्य कोणत्याही माध्यमातून एकाच मोबाईल क्रमांकावरून/लॉगिनमधून एकच प्रकरण दाखल करता येईल, अशी महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा महामंडळाने प्रस्तावित केली आहे.
या सुधारणेमुळे Annasaheb Patil Karj Yojana मध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता कमी होईल आणि पात्र लाभार्थ्यांनाच त्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होते की, महामंडळ एका बाजूला तांत्रिक सुधारणा करून पात्रता प्रमाणपत्राची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला Annasaheb Patil Karj Yojana मध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज






