लाडकी बहीण योजना या लाभार्थी महिलांना e-KYC मधून सूट; शिफारस नमूना पत्र डाउनलोड करा

By MarathiAlert Team

Published on:

महिला व बाल विकास आयुक्तालयाने (महिला विकास शाखा), महाराष्ट्र राज्य, पुणे, यांनी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्यासाठी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांच्या पडताळणी आणि प्रमाणीकरण (e-KYC Aadhaar Authentication) संदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे.

या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तातडीने जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजना e-KYC साठी या तारखेपर्यंत अंतिम मुदत

लाडकी बहीण या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- चा आर्थिक लाभ थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे दिला जात आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी ही योजना २८ जून २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-KYC माध्यमातून Aadhaar Authentication करण्याकरिता दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या लाभार्थी महिलांना e-KYC सूट

नवीन परिपत्रकानुसार, ज्या पात्र लाभार्थी महिलांना e-KYC करताना त्यांच्या पती किंवा वडिलांच्या मृत्यूमुळे आधार क्रमांकावर OTP (One Time Password) प्राप्त होण्यास अडचण येत आहे, अशा महिलांसाठी eKYC संदर्भात विशेष सूचना देण्यात आली आहे.

अशा महिलांनी स्वतःचे e-KYC पूर्ण केल्यानंतर त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र / घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकेकडे दिनांक 31.12.2025 पर्यंत जमा करणे शासनाचे बंधनकारक निर्देश आहेत.

Ladki Bahin Yojana ekyc Sut Namuna PDF

वरील संवर्गात येणाऱ्या महिलांना e-KYC पासून सूट मिळवण्यासाठी ‘Ladki Bahin Yojana ekyc Sut Namuna PDF’ अर्ज

पात्र लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेले e-KYC अर्ज (CDPO) ग्रामीण/नागरी यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येणार आहेत.

ज्या महिलांना e-KYC करण्यापासून सूट मिळवण्यासाठी शिफारस हवी आहे, त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविकेमार्फत शिफारस देण्याबाबतचा एक विशिष्ट Ladki Bahin Yojana ekyc Sut Namuna PDF नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी या नमुन्यातील अर्ज आणि लाभार्थ्यांची स्वयंस्पष्ट शिफारस विहित कालमर्यादेत आयुक्त्, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्याकडे सादर करणे अपेक्षित आहे. Ladki Bahin Yojana ekyc Sut Namuna PDF भरून योग्य वेळी जमा करणे हे संबंधित लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी, विशेषतः ज्या महिलांना e-KYC मध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. योग्य कागदपत्रे आणि Ladki Bahin Yojana ekyc Sut Namuna PDF चा वापर करून e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

लाडकी बहीण योजना eKYC सूट नमूना शिफारस पत्र पीडीएफ येथे डाउनलोड करा

अधिक माहितीसाठी आणि ekyc ऑनलाईन करण्यासाठी भेट द्या : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Ladki Bahin Yojana ekyc Sut Namuna PDF
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!