लाडकी बहीण योजना e-Kyc बाबत महत्त्वाचे अपडेट!

Published On: December 3, 2025
Follow Us
Ladki Bahin Yojana New Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) संदर्भात प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र” अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार असल्याची महत्वाची माहिती नुकतीच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे. सविस्तर पाहूया.

लाडकी बहीण योजना e-Kyc बाबत महत्त्वाचे अपडेट!

लाडकी बहीण ही योजना २८ जून २०२४ रोजी सुरू झाली असून, राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा रु. १,५००/- चा आर्थिक लाभ थेट त्यांच्या खात्यात (DBT) देण्यात येत आहे.

काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. “प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र” अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत.

या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी e-Kyc प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

योजने संदर्भात विविध प्रसार माध्यमांतून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी केवळ राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर / शासन निर्णयाच्या माध्यमातून / अधिकृत प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.

e-Kyc ची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत सर्व लाभार्थी भगिनींनी e-Kyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती.

पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय

१८ नोव्हेंबर रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, राज्यातील विधवा, घटस्फोटित आणि ज्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत, अशा महिलांसाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.

या महिलांनी काय करावे?

१. सर्वप्रथम: स्वतःचे e-KYC पूर्ण करावे.

२. नंतर: पती/वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र (किंवा न्यायालयाचे आदेश) याची सत्यप्रत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करावी.

अंगणवाडी सेविका ही कागदपत्रे तपासून ई-केवायसी करण्यापासून सूट देण्याबाबतची शिफारस शासनाकडे करतील. हा निर्णय अशा भगिनींना कागदपत्रांच्या किचकट प्रक्रियेतून मोठा दिलासा देणारा आहे.

लाडकी बहीण योजना e-KYC मधून मिळण्याबाबतचे शिफारस नमूना पत्र येथे डाउनलोड करा

‘लाडकी बहीण’ योजना e-Kyc बाबत महत्त्वाचे अपडेट!

योजनेचा लाभ नियमितपणे आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा, यासाठी सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी (e-Kyc) पूर्ण करणे अनिवार्य आहे.

महत्त्वाची सूचना: ई-केवायसी करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे, सर्व भगिनींना पुरेसा वेळ मिळाला असून त्यांनी या मुदतीत आपली प्रक्रिया पूर्ण करावी. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर त्वरित संबंधित केंद्राशी संपर्क साधा.

केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा

कोणत्याही प्रसार माध्यमांतून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित होऊ नका. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली आहे आणि शासन ती यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहे. अफवांवर नव्हे, तर तुमच्या हक्काच्या लाभावर लक्ष केंद्रित करा.

  • या योजनेबद्दलची कोणतीही माहिती तपासण्यासाठी फक्त राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in/ किंवा शासन निर्णयांसाठी https://gr.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.

ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर आजच करा आणि आपल्या हक्काचा लाभ सुनिश्चित करा!

महिला योजना

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment