NMMS Result : शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी निकाल जाहीर

By Marathi Alert

Published on:

NMMS Result : शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी निकाल जाहीरमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2024-25 चा गुणवत्ता यादी निकाल www.mscepune.in व mscenmms.in या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. ही परीक्षा १२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली होती.

NMMS परीक्षेचा उद्देश

सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तौच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NMMS शिष्यवृत्ती किती मिळते?

सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) आहे.

  • आठवी पास विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹12,000 (म्हणजेच दरमहा ₹1,000) शिष्यवृत्ती मिळते.
  • इ. ९ वी ते १२ वी पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

महाराष्ट्र CET CELL कडून महत्त्वाची सूचना!

NMMS परीक्षेचा उत्तीर्णतेचा निकष

  • सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी: दोन्ही विषयात एकत्रित 40% गुण आवश्यक
  • SC/ST आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी: दोन्ही विषयात एकत्रित 32% गुण आवश्यक

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती

NMMS 2024-25 गुणयादी जाहीर – येथे पहा!

गुणयादी जाहीर दिनांक: 07 फेब्रुवारी 2025

NMMS Result गुणयादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

स्टेप 1 : सर्वप्रथम https://www.mscepune.in/ या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

स्टेप 2 : त्यानंतर NMMS या टॅब वर क्लिक करा.

स्टेप 3 : नंतर NMMS Exam 2024-25 Result (निकाल) यावर क्लिक करा.

nmms result

स्टेप 4 : आता Seat No आणि Mother Name आवश्यक माहिती भरा. आणि सर्च बटणावार क्लिक करा

स्टेप 5 : निकाल पाहा. आणि भविष्यासाठी डाउनलोड करा.

दुरुस्तीबाबत सूचना

  • विद्यार्थ्यांच्या नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि आडनावामध्ये स्पेलिंग दुरुस्तीची संधी उपलब्ध!
  • पूर्ण नाव बदलण्यास परवानगी नाही.
  • जन्मतारीख, जात, आधार क्रमांक आदी माहिती दुरुस्त करण्याची संधी!
  • शाळेच्या लॉगिनमधून ऑनलाईन अर्ज दि. 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत सबमिट करावा.
  • टपाल, ई-मेल किंवा समक्ष अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी वेळेत आवश्यक दुरुस्ती करून अंतिम निवडयादीच्या (NMMS Result) प्रतीक्षेत राहावे! अधिक माहितीसाठी https://2025.mscenmms.in/result/ या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या.

NMMS Result

Leave a Comment

error: Content is protected !!