राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक काढून Post Mapping Sanch Manyta संदर्भात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक अडचणी किंवा मानवी चुकांमुळे पदांच्या मॅपिंगमध्ये झालेली तफावत दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
Post Mapping Sanch Manyta नेमका काय आहे निर्णय?
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, शालार्थ प्रणालीमध्ये पदांच्या मॅपिंगमध्ये (Post Mapping) काही चुका निदर्शनास आल्या आहेत. या चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास, शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या संबंधित वेतन पथक अधीक्षकांकडे (Pay Unit Superintendent) नेमकी काय दुरुस्ती करायची आहे, याचा सविस्तर तपशील सादर करावा.
या विनंतीनुसार, वेतन पथक अधीक्षक शालार्थ प्रणालीवरील “संचमान्यता इंटीग्रेशन” या टॅबवर जाऊन संबंधित शाळेच्या विनंतीनुसार पदे मॅपिंग (Mapping) करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करतील. यामुळे चुकीच्या मॅपिंगमुळे रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
संचमान्यता आणि शालार्थ प्रणालीचे इंटीग्रेशन
आपल्याला माहितच आहे की, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेच्या आधारे राज्यात Post Mapping Sanch Manyta प्रक्रिया वेगाने सुरू आहे. एनआयसी (NIC) कडील संचमान्यता API चा वापर करून संचमान्यता आणि शालार्थ प्रणाली यांचे इंटीग्रेशन (Interpetition) करण्यात आले आहे. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश हाच आहे की, संचमान्यतेमध्ये मंजूर असलेल्या (उच्चतम मान्य) शिक्षक व शिक्षकेतर पदांपेक्षा अधिक पदांचे वेतन काढले जाऊ नये. शासनाच्या तिजोरीवर पडणारा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
उच्च माध्यमिक शाळांसाठीही सूचना
माध्यमिक शाळांनुसारच, उच्च माध्यमिक (अनुदानित/अंशतः अनुदानित) शाळांच्या संचमान्यतेची माहिती शालार्थ प्रणालीवर नोंदवणे आणि संचमान्यता पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि Post Mapping Sanch Manyta अचूक करण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत.
मुख्याध्यापकांसाठी आवाहन
ज्या शाळांच्या संचमान्यतेमध्ये आणि शालार्थ प्रणालीतील नोंदीमध्ये तफावत आहे, अशा शाळांनी त्वरित आपल्या वेतन पथकाशी संपर्क साधावा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वेतनाची देयके सुरळीत निघण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही Post Mapping Sanch Manyta प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.





