Anganwadi Sevika Madatnis Salary : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी वर्षाच्या शेवटी एक दिलासा देणारी गुड न्यूज आहे. राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे आता डिसेंबर महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्या मानधनाबाबत शासन निर्णय जारी
महिला व बाल विकास विभागाने दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर २०२५ या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शासनाने यासाठी तब्बल १७८.७२ कोटी रुपये (१७८ कोटी ७२ लाख) एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी राज्याच्या हिश्श्यातून (अतिरिक्त राज्य हिस्सा) दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे, Anganwadi Sevika Madatnis Salary वेळेवर होण्यासाठी हा निधी तत्काळ एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या शासन निर्णयान्वये, नवी मुंबई येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना हा निधी वितरीत व खर्च करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
तसेच, वित्त विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून विहित पद्धतीने हा निधी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
अंगणवाडी कर्मचारी आपल्या मानधनासाठी अनेकदा प्रतीक्षा करत असतात. मात्र, शासनाने डिसेंबर महिन्यासाठीच्या Anganwadi Sevika Madatnis Salary संदर्भात तातडीने पावले उचलल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या निधीमध्ये ‘विशेष पोषण आहार कार्यक्रम’ आणि ‘अंगणवाडी सेवा’ या लेखाशीर्षाखालील तरतुदीचा वापर करण्यात आला आहे.
शासन निर्णय महत्वाचे मुद्दे
- विभाग: महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन.
- निधीचा उद्देश: डिसेंबर २०२५ चे मानधन व प्रोत्साहन भत्ता.
- मंजूर रक्कम: १७८.७२ कोटी रुपये.
- दिनांक: २९ डिसेंबर २०२५.
शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची आर्थिक चिंता मिटणार असून, Anganwadi Sevika Madatnis Salary खात्यात जमा होण्याची प्रक्रिया आता वेगवान होणार आहे.
अधिक माहितीसाठी : अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता बाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नोव्हेंबर महिन्याच्या पगारासाठी निधी वितरित – शासन निर्णय जारी येथे पहा












