तुम्ही जर केंद्र सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल, तर सध्या एकाच विषयाची चर्चा जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे (8th Pay Commission) ८ व्या वेतन आयोगाची घोषणा कधी होणार आणि त्यात पगार किती वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यात आली असून, लवकरच ही समिती फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) ठरवणार आहे. आज आपण आकडेवारीसहित (Data-driven) पाहूया की, 8th Pay Commission या आयोगामुळे तुमच्या पगारात नेमकी किती वाढ होऊ शकते आणि तज्ज्ञांचे यावर काय मत आहे.
8th Pay Commission नवीन सॅलरी किती वाढणार!
फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor): सर्वात आधी हे समजून घ्या की तुमचा पगार कसा वाढतो. यासाठी ‘फिटमेंट फॅक्टर‘ महत्त्वाचा असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुमच्या सध्याच्या बेसिक पगाराला ज्या संख्येने गुणले जाते, त्याला फिटमेंट फॅक्टर म्हणतात.
जुना संदर्भ (7th CPC): ७ व्या वेतन आयोगात हा फॅक्टर २.५७ होता. (उदा. जर तुमचा बेसिक पगार ७,४४० रुपये होता, तर तो २.५७ ने गुणून १८,००० रुपये झाला.)
नवीन शक्यता: ८ व्या वेतन आयोगात हा फॅक्टर १.९ ते २.८६ च्या दरम्यान असू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ञांच्या विश्लेषणानुसार, आपण दोन परिस्थिती (Scenarios) पाहूया. यामुळे तुम्हाला तुमच्या पगारात किती वाढ होऊ शकते याचा अंदाज येऊ शकेल.
परिस्थिती 1: जर फिटमेंट फॅक्टर 2.86 राहिला तर
लेव्हल १ (शिपाई/हेल्पर)
- सध्याचा बेसिक पगार: ₹१८,०००
- नवीन बेसिक पगार: ₹५१,४८०
- थेट फायदा (वाढ): ₹३३,४८०
लेव्हल २ (LDC/कनिष्ठ लिपिक)
- सध्याचा बेसिक पगार: ₹१९,९००
- नवीन बेसिक पगार: ₹५६,९१४
- थेट फायदा (वाढ): ₹३७,०१४
लेव्हल ६ (इन्स्पेक्टर/पर्यवेक्षक)
- सध्याचा बेसिक पगार: ₹३५,४००
- नवीन बेसिक पगार: ₹१,०१,२४४
- थेट फायदा (वाढ): ₹६५,८४४
लेव्हल १० (क्लास १ ऑफिसर)
- सध्याचा बेसिक पगार: ₹५६,१००
- नवीन बेसिक पगार: ₹१,६०,४४६
- थेट फायदा (वाढ): ₹१,०४,३४६
वरील विश्लेषणावरून लक्षात येते की, लेव्हल १ च्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Basic Pay) थेट ३३ हजारांनी वाढू शकतो. ही वाढ महागाईच्या काळात अत्यंत दिलासादायक ठरेल.
परिस्थिती 2 : जर फिटमेंट फॅक्टर 2.15 राहिला (मध्यम वाढ)
जर सरकारने मध्यम मार्ग स्वीकारला, तर वाढ खालीलप्रमाणे असेल
- Level 1 (Entry): ₹१८,००० वरून वाढून ₹३८,७०० होईल. (फायदा: ₹२०,७००)
- Level 10 (mid/senior level): ₹५६,१०० वरून वाढून ₹१,२०,६६५ होईल. (फायदा: ₹६४,५१७)
- Level 18 (Top Officers): ₹२,५०,००० वरून वाढून ₹५,३७,५०० होईल.
सगळ्यांना समान वाढ मिळणार का?
येथेच खरा मुद्दा आहे. [8th Pay Commission] मध्ये सर्वांना एकच नियम लागणार की पदांनुसार नियम बदलणार? याबाबत दोन मतप्रवाह आहेत.
समान फॅक्टर (Uniform Factor): प्रतीक वैद्य यांच्या मते, सरकार सर्वांसाठी एकच फॅक्टर वापरण्याची शक्यता जास्त आहे. कारण महागाई आणि मार्केटची परिस्थिती सर्वांसाठी सारखीच आहे. ७ व्या वेतन आयोगातही असेच झाले होते.
वेगवेगळा फॅक्टर (Differential Factor): रामचंद्रन कृष्णमूर्ती यांच्या मते, सरकार खालच्या लेव्हलच्या कर्मचाऱ्यांसाठी (Low-income group) जास्त फिटमेंट फॅक्टर देऊ शकते.
का? कारण वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्या पगारातील तफावत (Gap) कमी करण्यासाठी हे गरजेचे आहे.
फायदा: यामुळे शिपाई किंवा क्लेरिकल स्टाफला टक्केवारीमध्ये जास्त पगारवाढ मिळेल, जे महागाईशी लढण्यासाठी त्यांना मदत करेल.
पेन्शनधारकांसाठी 8th Pay Commission चे समीकरण
जे लोक सध्या निवृत्त आहेत, त्यांच्यासाठीही हे समीकरण तितकेच महत्त्वाचे आहे.
- सध्याची किमान पेन्शन: ₹९,०००
- नवीन अंदाजित पेन्शन: जर २.८६ फॅक्टर लागला, तर किमान पेन्शन ₹२५,७४० पर्यंत जाऊ शकते.
हा बदल पेन्शनधारकांसाठी आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रांतीकारक ठरेल.
हे सर्व कधी लागू होणार?
घाई करू नका! ही प्रक्रिया थोडी मोठी आहे. आयोग आपला रिपोर्ट सरकारला सादर करेल. सरकार त्यावर विचार करेल आणि मग हिरवा कंदील दाखवेल.
सध्याच्या माहितीनुसार, २०२७ च्या उत्तरार्धात (Second half of 2027) ही पगारवाढ प्रत्यक्षात येऊ शकते. सणासुदीच्या काळात (Festive Season) सरकार याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission केवळ पगारवाढ नाही, तर तुमच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणारी संधी आहे. जर २.८६ चा फॅक्टर मंजूर झाला, तर सरकारी नोकरीचे चित्र पूर्णपणे बदलेल.










