महिलांसाठी मोठी संधी! लाडकी बहीण योजनेच्या लाभातून मिळाले 30 लाख रुपये, यांनी केले तुम्हीही करू शकता Majhi Ladki Bahin Nagpur Women Initiative

By Marathi Alert

Updated on:

Majhi Ladki Bahin Nagpur Women Initiative : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ (Majhi Ladki Bahin Yojana) घेणाऱ्या नागपूरच्या ३ हजार महिलांनी एकत्र येत ३० लाख रुपयांचा निधी उभारला असून, या निधीच्या मदतीने त्या स्वतःचे छोटे उद्योग सुरू करणार आहेत. महिलांच्या सशक्तीकरणाच्या या उपक्रमाला शासनाचीही पूर्ण साथ मिळणार आहे, अशी माहिती विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिली. जाणून घेऊया संपूर्ण माहिती

महिला सन्मान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूरमधील ३ हजार महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे.
  • या ३० लाख रुपयांच्या निधीतून महिला स्वतः छोटे उद्योग सुरू करणार आहेत, तसेच इतर महिलांनाही व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देणार आहेत.
  • एखादी दुर्घटना घडल्यास या निधीतून मदत केली जाईल.
  • मिळणाऱ्या व्याजावर ही सोसायटी कार्यरत राहणार आहे.

Majhi Ladki Bahin Nagpur Women Initiative : गरजू महिलांना आर्थिक सहाय्य, उद्योजकतेला चालना आणि मदतीची हमी देणारी ही योजना महिलांसाठी मोठे संजीवनी ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरोग्य विभागात २,००० पदनिर्मिती करण्यास राज्य सरकारची मंजूरी, या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू

महिला व बाल विकास विभागाचे सहकार्य

राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी महिला व बाल विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे.

  • महिला व बाल विकास विभाग अशा महिलांसाठी “सपोर्ट सिस्टिम” उभी करणार आहे.
  • महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) या महिलांना सर्वतोपरी मदत केली जाईल.

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत

  • या योजनेतील लाभार्थी ग्रामीण भागातील असल्याने, गावातील छोट्या व्यापाऱ्यांनाही अप्रत्यक्षपणे लाभ मिळेल.
  • माविम आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानामार्फत सुमारे ७.५ लाख महिला बचत गट ग्रामीण भागात कार्यरत आहेत.
  • या बचत गटांच्या माध्यमातून निधी उभारून महिलांना विविध उपक्रम राबवणे शक्य होईल.
  • ग्रामीण भागात निधी वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल आणि शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल.

अंगणवाडी भरती जाहिरात आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना: गरजू महिलांना सहाय्य

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) प्रामुख्याने ग्रामीण, आदिवासी तसेच झोपडपट्टीतील गरीब महिलांसाठी आहे. या योजनेंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.

  • राज्यातील ग्रामीण, आदिवासी आणि शहरातील झोपडपट्टी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.
  • या योजनेमुळे त्यांची आर्थिक उन्नती होऊन त्या सक्षम होतील.
  • योजनेसाठी अपात्र असलेल्या महिलांना लाभ परत करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महत्वाची अपडेट! DA, OPS, बालसंगोपन रजा, कंत्राटी पद्धतीऐवजी नियमित कर्मचारी भरती – सविस्तर जाणून घ्या

विशेष बाब म्हणजे, काही अपात्र लाभार्थी महिलांनी स्वेच्छेने मिळालेला लाभ परत केला आहे. योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीमुळे गरजू महिलांना अधिकाधिक संधी मिळत आहेत. (Majhi Ladki Bahin Nagpur Women Initiative) महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचलले गेलेले हे पाऊल राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नवा आदर्श ठरू शकते.

अधिक माहितीसाठी

महिला काटकसर करून आपल्या घरच्या गरजा पूर्ण करत असते. नागपूर जिल्हयातील महिलांप्रमाणे तुम्ही देखील या पद्धतीने संधीचा लाभ घेऊ शकता यासाठी आपल्या जवळच्या महिला व बालविकास विभागात संपर्क करावा. तसेच महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम)महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियान तालुका/जिल्हा स्तर कार्यालयात जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

अधिकृत वेबसाईट : https://udyog.mahaswayam.gov.in/

लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता कधी? पण ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत!

मंत्रीमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय येथे पाहा

महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांची सुधारित ज्येष्ठता यादी जाहीर!

Leave a Comment

error: Content is protected !!