Anganwadi Bharti Jalna 2025 : राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची मोठी भरती सुरू झाली असून, यामध्ये १८ हजाराहून अधिक रिक्त पदे भरण्यात येत आहे. नुकतेच अंगणवाडी भरती जालना जिल्ह्यात तब्बल ४५६ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Table of Contents
महाराष्ट्र अंगणवाडी भरतीच्या १८ हजार ८८२ रिक्त पदांची भरती सुरू
राज्यातील महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती करण्यात येत असून, तब्बल १८ हजार ८८२ रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया दिनांक ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे महिला व बालविकास विभागाचे नियोजन आहे.
आरोग्य विभागात २,०००+ पदनिर्मिती करण्यास राज्य सरकारची मंजूरी
तब्बल ४५६ रिक्त जागांसाठी जाहिरात Anganwadi Bharti Jalna 2025
अंगणवाडी मदतनीस आणि सेविका जालना जिल्ह्यातील भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक महिलांना एक चांगली संधी मिळाली आहे. या भरतीच्या तब्बल ४५६ रिक्त जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका ११४ पदे तर अंगणवाडी मदतनीस ३४२ पदे भरण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जालना भरती – रिक्त पदांचा तपशील
Anganwadi Bharti Jalna 2025
अ.क्र. | ग्रामीण प्रकल्पाचे नाव | अंगणवाडी सेविका रिक्त भरायची पदे | अंगणवाडी मदतनीस रिक्त भरायची पदे | अर्ज स्वीकारण्याचा दिनांक |
---|---|---|---|---|
1 | जालना-1 | 5 | 25 | 10 ते 24-2-2025 |
2 | जालना-2 | 12 | 35 | 07 ते 21-2-2025 |
3 | बदनापूर | 6 | 44 | 11 ते 25-2-2025 |
4 | अंबड-1 | 18 | 44 | 10 ते 24-2-2025 |
5 | अंबड-2 | 7 | 17 | 10 ते 24-2-2025 |
6 | घनसावंगी-1 | 13 | 33 | 10 ते 24-2-2025 |
7 | घनसावंगी-2 | 8 | 39 | 10 ते 24-2-2025 |
8 | परतूर | 9 | 16 | 13 ते 28-2-2025 |
9 | मंठा | 5 | 29 | 14 ते 28-2-2025 |
10 | भोकरदन-1 | 4 | 14 | 10 ते 24-2-2025 |
11 | भोकरदन-2 | 9 | 20 | 10 ते 24-2-2025 |
12 | जाफ्राबाद | 12 | 26 | 10 ते 24-2-2025 |
एकूण | — | 114 | 342 | — |
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती जालना जिल्ह्यातील जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी व शर्तीनुसार ज्या महसुली गावातील पद रिक्त आहे त्याच महसूली गावातील पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
महिलांसाठी मोठी संधी! लाडकी बहीण योजनेच्या लाभातून मिळाले 30 लाख रुपये, यांनी केले तुम्हीही करू शकता
जालना जिल्ह्यातील भोकरदन अंगणवाडी भरतीसाठी (Anganwadi Bharti Jalna 2025) सदर अर्ज स्विकारण्याचा कालावधी हा दिनांक 10/02/2025 ते दिनांक 24/02/2025 सायंकाळी 6:15 पर्यत (कार्यालयीन वेळेपर्यत) आहे. या भरतीचे अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रकल्प भोकरदन-2 (ग्रामीण) येथे सुट्टीचा दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येत आहे.
इतर जिल्ह्याची जाहिरात येथे पाहा
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज सादर करावेत – महिला व बालविकास विभाग
जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना तालुका प्रकल्पनिहाय पद भरती करण्यात येत आहे. तरी संबंधित महिलांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले आहे. या भरतीच्या पदांसाठी अर्ज हे तालुका एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत.
लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता कधी? पण ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत!
अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती
अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक कागदपत्रे यादी तसेच अटी आणि शर्ती व अर्ज नमूना आणि कोठे सादर करावा यासाठी संपूर्ण माहिती येथे वाचा
अधिकृत वेबसाईट : https://womenchild.maharashtra.gov.in/