ICDS Employee Salary GR: महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील (ICDS) कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ICDS कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्याच्या पगारासाठी निधी वितरीत
दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी महिला व बाल विकास विभागाने हा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील जानेवारी २०२६ या महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाने या (ICDS Employee Salary GR) द्वारे एकूण १२ कोटी ७७ लक्ष रुपये (१२.७७ कोटी) इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.
अंगणवाडी सेविकांसाठी गुड न्यूज! प्रशिक्षणासोबत मिळणार प्रवास भत्ता 24 कोटी निधी मंजूर
शासनाने मंजूर केलेला १२.७७ कोटींचा निधी खालील दोन प्रमुख बाबींसाठी वापरला जाणार आहे.
अंगणवाडी सेवा (अतिरिक्त राज्य हिस्सा – कार्यक्रम): या अंतर्गत वेतन शिर्षाखाली ८.५२ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधी १००% राज्य हिश्श्याचा भाग म्हणून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद आस्थापना अनुदान: महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये, जिल्हा परिषदांना अंगणवाडी सेवेसाठी जे सहाय्यक अनुदाने (वेतन) दिले जाते, त्यासाठी ४.२४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सदर निधीसाठी ‘आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई’ हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. हा निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच राज्याच्या वित्त व नियोजन विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जानेवारी महिना संपत असतानाच वेतनासाठी निधी उपलब्ध झाल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा (ICDS Employee Salary GR) शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा सांकेतांक २०२६०१२७१७३०१३१४३० असा आहे.
अधिक माहितीसाठी शासन निर्णय डाउनलोड करा








