Mahavitaran Bharti 2024: कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘या’ सरळसेवा भरती मध्ये 10 गुण अतिरिक्त मिळणार

By Marathi Alert

Updated on:

Extra points to Contract Employees Mahavitaran Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सरळसेवा भरती मध्ये आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 गुण अतिरिक्त देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये जाहिरात क्र. ०७/२०२३ , जाहिरात क्र.०१/२०२४ व जाहिरात क्र. ०९/२०२३ नुसार सहाय्यक अभियंता, विद्युत सहाय्यक पदांची सरळसेवा भरती अंतर्गत या पदांची रिक्तपदे भरण्याकरीता जाहिराती कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, त्या अनुषंगाने, उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले परंतु आता शासन निर्णय दि. २७ फेब्रुवारी २०२४ नुसार सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरीता आरक्षणाची तरतुद लागू करण्यात येणार असल्यामुळे पुन्हा नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन सुधारीत बिंदूनामावलीप्रमाणे पुन्हा नव्याने भरती होणार

शासन निर्णय दि. २७ फेब्रुवारी २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरीता आरक्षणाची तरतुद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात आली आहे.

नवीन सुधारीत बिंदूनामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात येईल. तसेच सदर भरती प्रक्रिया मा. उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्र.३४६८/२०२४ व इतर याचिकाबाबत मा. न्यायालयाचा आदेशाच्या अधीन राहून करण्यात येणार आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्चः अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही. सुधारीत रिक्तपदे, URL Link इ बाबतचे प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. उक्त पदाकरीता मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती इत्यादी अबाधित राहतील. असे कंपनीने काढलेल्या शुद्धिपत्रकात जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य रोजंदारी संघटनेचे आंदोलन; वर्ग ३ वर्ग ४ कर्मचारी संघटनेच्या काय आहेत मागण्या?

कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘या’ सरळसेवा भरती मध्ये 10 गुण अतिरिक्त मिळणार

महापारेषण कंपनीमधील वेतनगट 4 मधील तांत्रिक संवर्गातील विद्युत सहाय्यक (Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024) या पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये महापारेषण कंपनीत बाह्यस्त्रोताद्वारे कार्यरत, काम केलेल्या तसेच विहीत अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण या प्रमाणे 5 वर्षाकरीता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे.

Contract Basis Emplyoee

Leave a Comment