Movement of Maharashtra State Daily wage employees Association : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागातील रोजंदारी शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह वर्ग ३ वर्ग ४ कर्मचारी संघटना यांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बिऱ्हाड महाआंदोलन दि १० जुन २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे.
रोजंदारी वर्ग ३ वर्ग ४ कर्मचारी संघटनेच्या काय आहेत मागण्या?
- कार्यरत रोजंदारी, तासिका वर्ग 3 व वर्ग ४ कर्मचारी यांचे धोरणात्मक निर्णय घेऊन थेट विनाअट सरसकट समायोजन करावे.
- रोजंदारी वर्ग ४ कर्मचाऱ्यांचे मृत संवर्गातील पदे तात्काळ जिवीत करणे, व १६ नोव्हेंबर २०२२ चा सुधारित आकृतीबंध रद्द करावा.
सदर कर्मचारी संघटनेचे बिऱ्हाड महाआंदोलन आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग नाशिक ते मुंबई मंत्रालय असे आहे.
आदिवासी विभागातील रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचारी शासन सेवेत नियमित
राज्यातील रोजंदारी, तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना आदिवासी विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत कायम करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम करा – कोर्टाचे आदेश
या कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी वेळोवेळी सेवेत कायम करण्याबाबत आपले गाऱ्हाणे सरकार पुढे मांडले, त्या त्या वेळी कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या न्यायालयात कायम करण्याबाबत याचिका दाखल केल्या होत्या.
त्यावर सुनावण्या होऊन अंतिम निर्णय मा. उच्च व सर्वोच्च न्यायलय यांनी ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा 10 वर्ष पूर्ण झाल्या आहेत, त्यांना कायम करण्याचे आदेश द्या, असे शासन निर्णयामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे न्यायालय आणि सरकार यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी काढा – महिला व बालविकास मंत्री

