GDS Result Merit List 2025: महाराष्ट्र पोस्टल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2024 साठी List VI प्रसिद्ध केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 11 मार्च 2025 पर्यंत संबंधित विभागाच्या कार्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. (India Post Gds Result 2025)
Table of Contents
कागदपत्रांची पडताळणी कुठे करायची?
शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर व ई-मेलवर सूचना (SMS/Email) पाठवली असून, उमेदवारांच्या नावासमोर दिलेल्या Divisional Head Office मध्ये जाऊन पडताळणी करावी. यासाठी खाली दिलेल्या निवड यादीत नाव चेक करा.
आवश्यक कागदपत्रे
✔️ शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी/12वी गुणपत्रिका)
✔️ जात प्रमाणपत्र (जर लागू असेल)
✔️ रहिवासी प्रमाणपत्र
✔️ आधार कार्ड
✔️ पासपोर्ट साइज फोटो
✔️ सर्व कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित (self-attested) दोन प्रती
भव्य करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा – संधीचं सोनं करा!
महत्त्वाची सूचना:
⚠️ तुम्ही दिलेल्या तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहिले नाही, तर तुमची निवड रद्द होऊ शकते.
⚠️ अधिकृत संकेतस्थळावर वारंवार भेट द्या आणि तुमच्या SMS/ई-मेल नोटिफिकेशनची पडताळणी करत राहा.
✅ मूळ कागदपत्रे आणि स्वतः स्वाक्षरी केलेल्या दोन प्रती सोबत नेणे आवश्यक.
✅ पडताळणीसाठी वेळेत हजर राहणे अनिवार्य आहे.
✅ कागदपत्र पडताळणी अंतिम तारीख: 📅 11 मार्च 2025 पर्यंत संबंधित डिव्हिजनल हेड ऑफिसमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.
लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट – खात्यात ३००० रुपये जमा! चेक करा
📌 महत्त्वाचे: यादीमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बारामती, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, नाशिक, पुणे, नागपूर, ठाणे आणि इतर अनेक जिल्ह्यांमधील 300 हून अधिक निवड झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. (GDS Result Merit List 2025)
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती
महाराष्ट्र GDS भरती 2025 – निकाल आणि मेरिट लिस्ट कशी पाहायची?
जर तुम्ही ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 साठी अर्ज केला असेल, तर खालील पद्धतीने तुमचा निकाल आणि मेरिट लिस्ट तपासा. (GDS Result Merit List 2025)
स्टेप-बाय-स्टेप GDS मेरिट लिस्ट पाहा GDS Result Merit List 2025
- स्टेप 1: अधिकृत इंडिया पोस्ट GDS वेबसाइटला भेट द्या – https://indiapostgdsonline.gov.in/
- स्टेप 2: मुख्य पानावर “GDS Online Engagement Schedule,July-2024 Shortlisted Candidates” विभाग शोधा.
- स्टेप 3: तुमचा राज्य निवडा – “महाराष्ट्र”
- स्टेप 4: “महाराष्ट्र GDS मेरिट लिस्ट 2025 (PDF)” लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 5: PDF डाउनलोड करा आणि उघडा.
- स्टेप 6: Ctrl + F दाबून तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा नाव शोधा.
- स्टेप 7: जर तुमचे नाव यादीत असेल, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी (कागदपत्र पडताळणीसाठी) कोणत्या Divisional Head Office मध्ये हजर राहायचे ते तपासा.
महाराष्ट्र GDS मेरिट लिस्ट 2025 येथे पाहा डायरेक्ट लिंक
GDS Result Merit List 2025 Download Direct Link
- GDS Online Engagement Schedule,July-2024 – Maharashtra Circle – List I
- GDS Online Engagement Schedule,July-2024 – Maharashtra Circle – List II
- GDS Online Engagement Schedule,July-2024 – Maharashtra Circle – List III
- GDS Online Engagement Schedule,July-2024 – Maharashtra Circle – List IV
- GDS Online Engagement Schedule,July-2024 – Maharashtra Circle – List V
- GDS Online Engagement Schedule,July-2024 – Maharashtra Circle – List VI
पोस्ट ऑफिस भरती 2025! कोणतीही परीक्षा नाही – थेट मेरिट लिस्टवर निवड!
GDS Online Engagement Schedule, July-2024 – Maharashtra Circle – List VI
- These shortlisted candidates should get their documents verified through the Divisional Head mentioned against their names on or before 11/03/2025.
- The shortlisted candidates should report for verification along with originals and two sets of self attested photocopies of all the relevant documents
- SMS/email will be sent to the registered mobile number/email address.
👉 तुम्ही निवड झाली आहे का? यासाठी अधिकृत यादी त्वरित तपासा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा!
GDS पदाचे काम काय असते? – संपूर्ण माहिती
ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 अंतर्गत तीन प्रमुख पदांसाठी निवड केली जाते – ब्रँच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक. खाली या पदांच्या जबाबदाऱ्या व कामाचे स्वरूप दिले आहे.
▶ ब्रँच पोस्टमास्तर (BPM) – शाखा पोस्टमास्तर
📌 मुख्य जबाबदाऱ्या:
✅ शाखा पोस्ट ऑफिसचा दैनंदिन कार्यभार सांभाळणे.
✅ इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) सेवा पुरवणे व आर्थिक व्यवहार हाताळणे.
✅ डाक विभागाच्या विविध सेवांचे विपणन व प्रचार करणे.
✅ इतर पदांशी समन्वय साधून काम करणे.
✅ निवड झाल्यास स्वतःच्या खर्चाने कार्यालयीन जागेची व्यवस्था करावी लागेल.
▶ असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (ABPM)
📌 मुख्य जबाबदाऱ्या:
✅ टपाल सेवा, स्टॅम्प विक्री आणि घरपोच पत्रांचे वितरण करणे.
✅ ग्राहक सेवा केंद्रे (CSC) व्यवस्थापित करणे.
✅ डाक विभागाच्या विविध योजनांचे प्रचार व व्यवहार पाहणे.
✅ BPM च्या अनुपस्थितीत कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळणे.
▶ डाक सेवक (Dak Sevak)
📌 मुख्य जबाबदाऱ्या:
✅ टपाल कार्यालयात किंवा रेल्वे मेल सेवा (RMS) मध्ये कार्यरत राहणे.
✅ टपाल पोचवणे, ट्रान्सपोर्टेशन आणि विविध पोस्टल ऑपरेशन्स हाताळणे.
✅ पोस्टमास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जबाबदाऱ्या पार पाडणे.