Anganwadi Sevika Bhatta Ladki Bahin Update: अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा भत्ता मंजूर

By Marathi Alert

Published on:

Anganwadi Sevika Bhatta Ladki Bahin Update: अंगणवाडी सेविकांनो, तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच मिळणार आहे! ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरल्याबद्दल तुम्हाला मिळणारा प्रोत्साहन भत्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने या कामासाठी ३१.३३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. अधिक माहितीसाठी वाचा!

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा भत्ता मंजूर Anganwadi Sevika Bhatta Ladki Bahin Update

‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जांसाठी अंगणवाडी सेविकांना ५० रुपये प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारनं जाहीर केले होते. हा भत्ता अजून मिळाला नव्हता, पण आता सरकारने निधी मंजूर केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका (Anganwadi Supervisor) यांना प्रोत्साहन भत्ता वितरीत करण्यासाठी एकूण ३१.३३ कोटी रुपये यासाठी मंजूर झाले आहेत. लवकरच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात हा भत्ता जमा होईल. असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट! पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा!

“लाडकी बहिण योजनेसाठी पात्र अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि सेविकांना तातडीने निधी वितरित केला जात आहे. शासन महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे.”

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) जाहीर करताच अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांवर अर्ज भरण्याची मोठी जबाबदारी आली. त्यांनी ऑफलाइन अर्ज भरून ते ऑनलाइन करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली आहे.

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ३१.३३ कोटींचा निधी मंजूर

संपूर्ण राज्यातील सुमारे अडीच लाख अंगणवाडी सेविकांनी हा मोठा भार उचलला. त्यामुळे आता ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्जांसाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता लवकरच मिळणार आहे. (Anganwadi Sevika Bhatta Ladki Bahin Update)

अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

Anganwadi Sevika Protsahan bhatta
Anganwadi Sevika Protsahan bhatta

अधिक माहितीसाठी: प्रोत्साहन भत्ता शासन निर्णय पाहा

‘समग्र शिक्षा’ अभियानातील ३७८४ कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा निर्णय! वाचा काय म्हणाले शिक्षणमंत्री!

Leave a Comment

error: Content is protected !!