सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! उपदानाची रक्कम ₹20 लाखांपर्यंत वाढवली! Gratuity Increase Maharashtra Update

By Marathi Alert

Published on:

Gratuity Increase Maharashtra Update: महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारे उपदान आणि मृत्यू उपदान या दोन्हींच्या फायद्यांमध्ये शासनाने वाढ केली आहे. यापूर्वी ही रक्कम १४ लाख रुपये होती, परंतु आता ती वाढवून २० लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे, कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. तसेच, कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबालाही अधिक मदत मिळणार आहे.

काय आहे निर्णय?

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती (Retirement) व मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ₹१४ लाखांवरून ₹२० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ १ सप्टेंबर २०२४ पासून लागू करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔹 लाभार्थी:
✅ राज्य सरकारी कर्मचारीकुटुंब निवृत्त वेतनधारक
✅ मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक

दिनांक ११ मार्च, २०२५ रोजीचे शासन परिपत्रक

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिनांक ११ मार्च, २०२५ रोजी एक शासन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.

🔹 यापूर्वी सेवानिवृत्ती उपदान (Gratuity) व मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ₹14 लाख होती.
🔹 नवीन निर्णयानुसार ही मर्यादा ₹20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
🔹 01 सप्टेंबर 2024 पासून हा निर्णय लागू होईल.
🔹 हा निर्णय केंद्र शासनाच्या धोरणाच्या धर्तीवर घेतला गेला आहे.

खुशखबर! राज्यातील लाखो निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा! महागाई भत्त्यात भरघोस वाढ!

कोणाला होणार लाभ?

सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेत वाढीचा निर्णय हा शालेय शिक्षण विभागातील खालील पदांवर कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असेल.

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी
मान्यता प्राप्त खाजगी शाळांमधील 100% अनुदानित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयांमधील कर्मचाऱ्यांना

गुड न्यूज! राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता लागू, X, Y, Z वर्गातील शहरे आणि गावे 

कधीपासून मिळणार लाभ!

सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा १ सप्टेंबर २०२४ पासून ₹१४ लाखांवरून ₹२० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

HSRP प्लेट: आता जुन्या वाहनांसाठी पण आवश्यक! नियम, किंमत आणि अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

🔹 महत्वाचे मुद्दे:
✅ हा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांसाठी लागू होणार आहे.
मान्यता व अनुदानित शैक्षणिक संस्थांतील कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल.
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील निवृत्तीवेतनधारकांनाही ही वाढ लागू होईल.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती!

फॅमिली पेंशन (कुटुंब निवृत्तिवेतन) आणि डेथ ग्रॅच्युटी (मृत्यू उपदान) म्हणजे काय?

सेवेत असताना मृत्यू झाल्यास:
👉 कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला फॅमिली पेंशन (जुनी पेन्शन योजना) आणि मृत्यू उपदान मिळेल.
👉 मृत्यू उपदानाची रक्कम कर्मचाऱ्याच्या सेवेकाळानुसार निश्चित केली जाईल.

रुग्णता (मेडिकल) सेवानिवृत्ती झाल्यास:
👉 रुग्णता निवृत्तिवेतन (पेन्शन) आणि सेवा उपदान (ग्रॅच्युटी) लागू करण्यात आली आहे.
👉 गंभीर आजार, अपघात किंवा शारीरिक दुर्बलतेमुळे सेवा समाप्त झाल्यास कर्मचाऱ्याला हा लाभ दिला जाणार आहे.

नियमित सेवानिवृत्ती झाल्यास:
👉 सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच रिटायरमेंट ग्रॅच्युटी (सेवा उपदान) मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! अखेर महागाई भत्ता (DA) वाढला!

उपदान रक्कम म्हणजे काय?

उपदान ही शासनाकडून कर्मचाऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत आहे, जी त्यांच्या सेवाकालावर अवलंबून असते.

सेवाकालानुसार मिळणारे उपदान: Gratuity Calculation Formula

सेवेचा कालावधीमिळणारे उपदान
1 वर्षाच्या आत सेवाअंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम
1 ते 5 वर्ष सेवाअंतिम वेतनाच्या 6 पट रक्कम
5 ते 11 वर्ष सेवाअंतिम वेतनाच्या 12 पट रक्कम
11 ते 20 वर्ष सेवाअंतिम वेतनाच्या 20 पट रक्कम
20 वर्षांपेक्षा जास्त सेवाअंतिम वेतनाच्या 33 पट रक्कम (कमाल ₹20 लाख मर्यादा)

वर दिलेली Gratuity Calculation माहिती ही प्राथमिक अंदाजावर असून, तुमच्या विभाग, पद, सेवा नुसार नियम बदलू शकतात. त्यामुळे यासाठी अधिक माहिती लेखा विभागाकडून मिळवा.

या निर्णयाचा फायदा:

Gratuity Increase Maharashtra Update या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. तसेच, कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबालाही आर्थिक मदत मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

8 व्या वेतन आयोगाची घोषणा! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?

Gratuity Calculator

Gratuity Calculator

Calculate your estimated gratuity amount with this simple tool. Please enter the required details below:

Important Notes:

  • This calculator provides an estimate based on standard gratuity calculation formulas.
  • The maximum gratuity amount is capped at ₹20,00,000 as per the latest government regulations.
  • For accurate calculations, please refer to your official salary slips and consult with your HR department.
  • The calculation uses 15 days of salary for each completed year of service, based on the last drawn basic salary plus dearness allowance.

Disclaimer: This calculator is for informational purposes only and should not be considered as financial advice. Actual gratuity amounts may vary.

For official information, refer to the government circular: शासन निर्णय पाहा

अधिक माहितीसाठी: शासन निर्णय

राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय! सरकारकडून मोठा खुलासा!

Leave a Comment

error: Content is protected !!