राज्यात शिक्षकांच्या 67,000 जागा रिक्त असल्याबाबत (तारांकित प्रश्न) सरकारकडून खुलासा

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Teacher Recruitment : राज्यात शिक्षकांच्या 67,000 जागा रिक्त असल्याबाबत माननीय विधानपरिषद सदस्य श्री. निरंजन डावखरे, श्री. प्रविण दरेकर, श्री. प्रसाद लाड, श्री. रमेशदादा पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे.

राज्यात शिक्षकांच्या 67,000 जागा रिक्त असल्याबाबत (तारांकित प्रश्न) सरकारकडून खुलासा

प्रश्न क्र. 1) राज्यात 30,000 शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) माहे जून, 2023 पर्यंत करण्याची घोषणा मा. शालेय शिक्षणमंत्री महोदयांनी केली असल्याचे माहे एप्रिल, 2024 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय?

खुलासा प्रश्न क्र.1) होय, हे खरे आहे.

प्रश्न क्र. 2) असल्यास, इयत्ता पहिली ते दहावी या वर्गाकरीता व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीपर्यंतच्या वर्गाकरीता असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांच्या 67,000 जागा रिक्त असल्याचे त्याच दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय?

खुलासा प्रश्न क्र.2) हे खरे नाही.

प्रश्न क्र. 3) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने सदर शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

खुलासा प्रश्न क्र.3) शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी, 2022 मधील प्राप्त गुणांकनास अनुसरुन एकूण 21678 शिक्षकीय पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहीराती आल्या आहेत. यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात 11,085 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली असून, समांतर आरक्षणामधील रिक्त राहीलेल्या जागा व उर्वरित मुलाखतीसह या प्रकारातील शिक्षकीय पदांची पवित्र प्रणालीमार्फत भरती करण्याची कार्यवाही सुरु असल्याचा खुलासा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

अधिक माहितीसाठी: टेलिग्राम जॉईन करा

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!