Asha Workers Salary : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन शुद्धीपत्रक जारी

By Marathi Alert

Updated on:

Asha Workers Salary : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासंदर्भात महत्वाची अपडेट, या कर्मचाऱ्यांच्या वाढीव मोबदला देण्यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 18 जुन २०२४ रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन 2024-25 या आर्थिक वर्षातील वाढीव मोबदला देण्यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक 5 जुन रोजी निर्गमित करण्यात आला होता, त्यामध्ये एप्रिल 2024 ते जून, 2024 या 3 महिन्याचे वाढीव मोबदला देण्याबाबत निधी वितरीत करण्यात येत आहे, असे नमूद करण्यात आले होते. मात्र आता यामध्ये सुधारणा करण्यात आली असून, याबाबतचे शासन शुद्धीपत्रक दिनांक 18 जुन 2024 रोजी काढण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा वाढीव मोबदला बाबत – शासन शुद्धीपत्रक Asha Workers Salary

दिनांक 18 जुन 2024 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2024-25 च्या राज्यशासनाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना एप्रिल 2024 या महिन्याचा मोबदला रु.८२७२.३० लक्ष इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

शासन शुध्दीपत्रक : दिनांक 18 जुन 2024 येथील शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आलेल्या एप्रिल, २०२४ ते जून, २०२४ या कालावधी ऐवजी आता एप्रिल, २०२४ व रु.२४८१६.९२ लक्ष या ऐवजी रु.८२७२.३० लक्ष असे वाचण्यात यावे. अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. म्हणजेच हा वाढीव मोबदला फक्त एप्रिल महिन्याचा देण्यात आला आहे. (शासन निर्णय)

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना वाढीव मोबदला देण्याचा निर्णय! | Asha Workers Salary Increase

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरीता त्यांना राज्य शासनाने प्रत्येकी रु.५०००/- व ६२००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दिनांक १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयान्वये आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मानधनात (Asha Workers Salary Increase) अनुक्रमे रु.५००० व रु.१००० इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडयात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण ५८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो.

0 thoughts on “Asha Workers Salary : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचा वाढीव मोबदला मंजूर, शासन शुद्धीपत्रक जारी”

  1. कामाचा ताण पाहता आशा वर्कर यांना केलेली पगार वाढ हे त्यांच्या कुटुंबासाठी चांगले योगदान आहे परंतु त्यांचे काम पाहता ही झाली पगार वाढ त्यांना असंतुष्टता ची जाणीव देणारे आहे शासनाने त्यांचे काम करतात अजून सात हजाराची पगार वाढ करावी

    Reply

Leave a Comment