राज्यातील या उमेदवारांना आता सरकारी नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण लागू

By Marathi Alert

Updated on:

Player Reservation: राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील या उमेदवारांना आता सरकारी नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण लागू

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षणाबाबतच्या सुधारीत तरतुदी दिनांक 20 जून रोजीच्या शासन निर्णयानुसार विहित करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार आता दिनांक १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयातील अ.क्र. (३) स्पर्धाविषयक अन्य अटी व शर्ती – अ) (ii)(iv) (v) (vi) खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात आल्या आहेत.

  • (अ) (iii) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन भारतीय ऑलिम्पिक समितीची मान्यता/संलग्नता असलेल्या संबंधित खेळाच्या राष्ट्रीय फेडरेशनने/संघटनेने केलेले असावे.
  • (iv) राज्य क्रीडा अजिंक्यपद स्पर्धाचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनची मान्यता/संलग्नता असलेल्या संबंधित खेळाच्या राज्य संघटनेने केलेले असावे. तसेच ज्या खेळांच्या नोंदणीकृत राज्य संघटनांना त्यांच्या अधिकृत राष्ट्रीय संघटनांनी मान्यता/संलग्नता दिलेली असेल, तसेच सदर खेळांच्या राष्ट्रीय संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशने मान्यता/संलग्नता दिलेली असल्यास, अशा राज्य संघटनेच्या स्पर्धेतील राज्यस्तरीय प्राविण्यप्राप्त खेळाडूंना आरक्षणाचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी संबंधित राज्य संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता/संलग्नता हा निकष अनिवार्य राहणार नाही.
  • (v) एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धा असल्यास स्पर्धा काळात सदर राष्ट्रीय संघटनेस इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची (IOA) मान्यता/संलग्नता असणे हा निकष अनिवार्य राहील.
  • (vi) एकविध खेळ संघटनेद्वारा आयोजित राज्य स्पर्धा असल्यास स्पर्धा कालावधीत सदर राज्य संघटनेस महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची (MOA) मान्यता/संलग्नता असणे हा निकष अनिवार्य राहील.

सदर शासन निर्णय हा ५% खेळाडू आरक्षणाअंतर्गत खेळाडूंद्वारे संबंधित उप संचालक (क्रीडा) यांचेकडे पडताळणीसाठी (Verification) केलेला अर्ज, सह संचालक यांचेकडे केलेले प्रथम अपील, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांच्याकडे केलेले द्वितीय अपील या प्रकरणांना तसेच क्रीडा संचालनालयाकडे पुनर्पडताळणीसाठी प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांनादेखील लागू राहील. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय पाहा)

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!