Staff Selection Commission Recruitment: कर्मचारी निवड आयोगाद्वारे मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) आणि हवालदार (CBIC आणि CBN) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दरम्यान, अर्जाची प्रक्रिया 27 जून 2024 पासून सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Staff Selection Commission Recruitment
अधिसूचनेनुसार, एकूण 8,326 रिक्त जागा भरल्या जातील. यासाठी उमेदवारांचे मूल्यमापन केले जाईल. (SSC Recruitment Last Date) 31 जुलै 2024 ही परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. तसेच उमेदवारांना 16 ते 17 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. उमेदवाराला ऑनलाईन मोडद्वारे 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल.
लवकरच MTS टियर 1 परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर करण्यात येईल, परंतु ती परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2024 च्या जवळपास घेतली जाईल. मल्टी टास्किंग स्टाफकरता एकूण 8,326 पदांपैकी 4,887, तर 3,439 पदे CBIC आणि CBN मधील हवालदार पदांसाठी राखीव आहेत.
भारतीय पोस्ट विभागात तब्बल 44228 जागांची मेगा भरती – जाहिरात येथे पाहा
वयोमर्यादा | Age Criteria for Staff Selection Commission Recruitment
- उमेदवाराचे वय CBN (महसूल विभाग) मध्ये MTS आणि हवालदार पदांसाठी 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
- CIBC हवालदार पदांसाठी (महसूल विभाग आणि MTS मधील काही पदांसाठी) उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी वयाची सवलत लागू आहे.
महावितरणमधे 6222 पदांसाठी मेगा भरती, पात्रता फक्त 12वी पास; ही आहे अर्जाची अंतिम तारीख
किमान पात्रता | Eligibility criteria of Staff Selection Commission Recruitment
- उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी इयत्ता 10 ची परीक्षा किंवा मॅट्रिक परीक्षा मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाकडून उत्तीर्ण केलेली असावी.
- संगणक आधारित परीक्षा (CBE) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) यांचा या प्रक्रियेमध्ये समावेश होतो. फक्त हवालदार पदासाठी पीईटी आणि पीएसटी परीक्षा लागू आहेत.
- शिवाय, संगणकावर आधारित परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, आणि आसामी, गुजराती, बंगाली, कन्नड, मणिपुरी, कोकणी, मल्याळम, पंजाबी, ओडिया, तेलगू, तमिळ, आणि उर्दू अशा 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल.
- सीबीईमध्ये दोन सत्रे असणार आहेत आणि त्या दोन्ही सत्रांसाठी प्रयत्न करणे अनिवार्य असणार आहे. जे उमेदवार कोणत्याही सत्राचा प्रयत्न करणार नाहीत त्या उमेदवारांना अपात्र घोषित केले जाईल.
CBE साठी CUT OFF
उमेदवारांना परीक्षेच्या सत्र 2 मधील कामगिरीच्या आधारावर शारीरिक चाचणी फेरीसाठी निवडले जाईल. मात्र, पहिल्या सत्रात उत्तीर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या सत्राचे गुण मोजले जाणार नाहीत.
सत्र 1 आणि सत्र 2 मधील कमीत कमी पात्रता गुण हे खालीलप्रमाणे असणार आहेत:
- अनारक्षित साठी 30 टक्के
- OBC, EWS श्रेणी साठी 25 टक्के
- इतर सर्व श्रेणीसाठी 20 टक्के
MTS 2024 साठी अर्ज कसा करावा? | Application Process
- SSC च्या ऑफिशियल वेबसाईट ssc.gov.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावरील ‘ऑनलाइन अर्ज करा’ या लिंकवर क्लिक करा.
- नवीन वापरकर्त्यांना स्वतःची नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी एक नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि अर्जदाराने दिलेल्या ईमेल आयडी किंवा फोन नंबरवर तो सेंड करण्यात येईल.
- अर्ज फी भरून ती सबमिट करा.
- अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
- शेवटी अर्ज सबमिट झाल्याचे पेज आणि फॉर्म डाउनलोड करून सेव्ह करा आणि त्याची एक प्रिंट भविष्यातील काढून घ्या.
महत्वाच्या लिंक
- मूळ जाहिरात (SSC Recruitment PDF) : येथे पाहा
- ऑनलाइन अर्ज करा : येथे करा
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://ssc.gov.in/