YCMOU Bed Admission 2025-27 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे (YCMOU) २०२५-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम २०२५ – २७ प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. हा शिक्षणक्रम सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी विशेषतः तयार करण्यात आला आहे.
YCMOU Bed Admission 2025-27 संपूर्ण माहिती
शिक्षणक्रमाविषयी महत्त्वाचे तपशील:
कालावधी: या शिक्षणक्रमाचा कालावधी किमान दोन वर्षांचा असून, तो जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंत पूर्ण करता येईल.
श्रेयांक: हा शिक्षणक्रम ८० श्रेयांकांचा आहे, ज्यामध्ये सुमारे २४०० अध्ययन तासांचा समावेश आहे. (एक श्रेयांक म्हणजे ३० ते ३५ तासांचा अभ्यास ).
माध्यम: बी.एड. शिक्षणक्रमाचे माध्यम मराठी आहे. स्वयं-अध्ययन साहित्यही मराठीत उपलब्ध आहे.
प्रवेश पात्रता:
- यू.जी.सी. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
- खुल्या प्रवर्गातील अर्जदारांना पदवी/पदव्युत्तर परीक्षेत किमान ५०% गुण (४९.५% ते ५०% पर्यंत) आणि मागासवर्गीय अर्जदारांना किमान ४५% गुण (४४.५% ते ४५% पर्यंत) असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र शासनाने ज्या प्राथमिक शिक्षकांना पदवीधर श्रेणी लागू केली आहे, त्यांना गुणांची अट नाही, फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- डी.एड./डी.टी.एड. पूर्ण केलेले आणि मान्यताप्राप्त प्राथमिक स्तरावर पूर्णवेळ/अर्धवेळ काम करणारे व किमान 2 वर्षांचा (अर्धवेळ असल्यास ४ वर्षे) अनुभव असलेले शिक्षक पात्र असतील.
प्रवेश अपात्रता: खालील प्रकारचे अर्ज अपात्र ठरवले जातील:
- ज्यांच्या सेवा आदेशात प्राथमिक शिक्षक नियुक्तीचा उल्लेख नाही.
- सध्या सेवेत असलेल्या शाळेच्या जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून अर्ज भरणारे.
- अपूर्ण आणि खोटी माहिती असलेले अर्ज.
- सध्या सेवेत नसलेले शिक्षक.
- तासिका वेतनावर कार्यरत शिक्षक.
- यू.जी.सी. मान्यता नसलेल्या विद्यापीठाचे पदवीधारक.
- पदवीच्या अंतिम परीक्षेला बसलेले, परंतु निकाल न लागल्याने पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेची सत्यप्रत न जोडणारे शिक्षक.
- बालवाडीत शिकवणारे शिक्षक.
जागा आणि आरक्षण:
- एन.सी.टी.ई. ने बी.एड. शिक्षणक्रमाला एकूण १५०० जागांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ४१/४२ जागा भरण्यात येतात.
- महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी ५०% जागा आरक्षित आहेत.
- दिव्यांगांसाठी ५% म्हणजेच एकूण ७५ जागा आरक्षित असतील. प्रत्येक जिल्ह्याला किमान २ किंवा कमाल ३ जागा दिल्या जातील. दिव्यांगांच्या प्रवेशासाठी UDID (Unique Disability Identity Card) प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
- महिला अर्जदारांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या ३०% जागा राखीव आहेत.
- सैनिक (आजी/माजी कर्मचारी/पत्नी/मुलगा/अविवाहित मुलगी) यांच्यासाठी २% जागा राखीव आहेत. प्रत्येक जिल्ह्याला किमान एक जागा दिली जाईल.
- स्वतंत्र सैनिक पती/पत्नी, मुलगा/अविवाहित मुलगी, भूकंप व प्रकल्पग्रस्त आणि विधवा व परितक्ता या संवर्गासाठी अतिरिक्त २ गुण दिले जातील.
- अनाथांसाठी १% समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी महत्त्वाच्या सूचना:
- अर्जदारांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून माहितीपुस्तिका डाउनलोड करावी आणि ऑनलाईन अर्ज भरावा.
- अर्ज भरताना माहितीची अचूकता तपासणे बंधनकारक आहे. एकदा ‘Submit’ बटण दाबल्यानंतर कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही.
- अर्जात दुरुस्तीसाठी शेवटच्या मुदतीनंतर स्वयं-संपादनाची संधी दिली जाईल.
- सेवा अनुभव ३० एप्रिल २०२५ पर्यंतचा ग्राह्य धरला जाईल. यानंतरचा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.
- ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीच्या मूळ पुराव्यांची पडताळणीवेळी सादर करणे अनिवार्य आहे. मूळ कागदपत्रे नसल्यास माहिती ग्राह्य धरली जाणार नाही.
- अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- आणि राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
- कागदपत्र पडताळणीनंतर प्रवेश अर्ज आपोआप लॉक होईल.
- अर्जदारांनी आपल्या शाळेच्या जिल्ह्यांतूनच अर्ज भरणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज बाद होईल.
- प्रवेशासंदर्भातील सर्व सूचना ‘http://ycmou.digitaluniversity.ac‘ या संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील.
प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार होईल. इतर कोणताही मार्ग कोणी सूचित केल्यास, मा. कुलसचिव यांच्याकडे लेखी तक्रार करावी.

महत्वाच्या लिंक
- YCMOU Bed Admission P80 – B.Ed. Program 2025-27 Prospectus_2025 (माहितीपुस्तिका)
- YCMOU Bed Admission ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
- अधिकृत वेबसाईट : https://ycmoubed.digitaluniversity.ac/
