फास्टॅग धारकांसाठी खुशखबर! आता वर्षाभराची चिंता मिटली, NHAI ने आणला नवा ‘वार्षिक पास’ Fast Tag Annual Pass

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fast Tag Annual Pass राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग वापरकर्त्यांसाठी एक अनोखी आणि सोयीची योजना सुरू केली आहे. वारंवार फास्टॅग रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी आता ‘फास्टॅग वार्षिक पास’ उपलब्ध झाला आहे.

Fast Tag Annual Pass

काय आहे हा वार्षिक पास?

  • हा पास ३,००० रुपयांना एकदा खरेदी केल्यावर, वर्षासाठी किंवा २०० टोल प्लाझा क्रॉसिंगपर्यंत वैध असेल.
  • या पासमुळे महामार्गावरील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
  • ही सुविधा विशेषतः व्यावसायिक नसलेल्या वाहनांसाठी आहे.
  • पास खरेदी केल्यावर दोन तासांत ‘राजमार्ग यात्रा’ ॲप किंवा NHAI च्या वेबसाइटवरून तो सक्रिय होतो.

उत्स्फूर्त प्रतिसाद

या नवीन योजनेला पहिल्याच दिवशी नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी १.४ लाख लोकांनी हा पास खरेदी केला आणि त्याचा वापरही सुरू केला. NHAI ने या योजनेची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी टोल प्लाझांवर विशेष अधिकारी नेमले आहेत. या पासमुळे आता नियमित प्रवाशांची वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.

अधिक माहितीसाठी : https://nhai.gov.in/

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!