अखेर, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ती आनंदाची बातमी आली आहे! महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट (Anganwadi Sevika Bhaubij Gift 2025) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा शासन निर्णय २५ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी यंदा लवकरच एक मोठे गिफ्ट दिले आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी, प्रत्येक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना रु. २,०००/- इतकी भाऊबीज भेट मंजूर करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाद्वारे २५ सप्टेंबर, २०२५ रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे, अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या भाऊबीज भेटीमुळे त्यांच्या कामाचा योग्य गौरव होणार आहे. ही Anganwadi Sevika Bhaubij Gift 2025 देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि आता ती प्रत्यक्षात आली आहे.
ही Aanganwadi Sevika Bhaubij Gift तात्काळ अदा करण्यासाठी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या भेटीसाठी (Aanganwadi Sevika Bhaubij Gift ) एकूण ४०.६१३० कोटी रुपये (चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपये) इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ (भाऊबीज भेट) या लेखाशीर्षाखालील तरतुदीमधून खर्च केला जाईल.
या निर्णयामुळे Anganwadi Sevika Bhaubij Gift 2025 लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. शासनाने नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीनंतर हा आदेश जारी केला आहे. या भाऊबीज गिफ्ट मुळे मुळे अंगणवाडी सेविकांच्या कामाचा सन्मान होईल आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल अशी आशा आहे.
अधिक माहितीसाठी : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी भाऊबीज भेट शासन निर्णय डाउनलोड करा