अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती! Anganwadi Sevika Madatnis Bharti Pay Hike

By Marathi Alert

Published on:

Anganwadi Sevika Madatnis Bharti Pay Hike: अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठी अपडेट! सरकारनं त्यांचा पगार ५००० रुपयांनी वाढवला आहे, आणि १८,००० नवीन जागांसाठी भरतीही सुरू केली आहे! स्मार्ट अंगणवाड्या, शिवजयंती उत्सव आणि महिलांसाठी अनेक नवीन योजनांची माहिती या पोस्टमध्ये दिली आहे. अधिक माहितीसाठी वाचा!

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन वाढ! Anganwadi Sevika Madatnis Bharti Pay Hike

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन ५००० रुपयांनी वाढविण्यात आले आहे. आजपर्यंत ही सर्वात मोठी मानधन वाढ आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही तटकरे यांनी सांगितले. (Anganwadi Sevika Madatnis Bharti Pay Hike)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! फेब्रुवारी 2025 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

राज्यात १८,००० नवीन अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती Anganwadi Sevika Bharti 2025 Maharashtra

राज्यात अठरा हजार नवीन अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याचाच उल्लेख महामहीम राज्यपाल महोदयांनी केला. (Anganwadi Sevika Bharti 2025 Maharashtra)

महिलांकरिता रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची सुमारे १८,००० रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत करण्यात येत असून, ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

महिलांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेत मोठी घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा भत्ता मंजूर

महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी भरतीचे एकूण रिक्त पदे

  • अंगणवाडी सेविका: 5,639
  • अंगणवाडी मदतनीस: 13,243
  • भरती या तारखेपर्यंत पूर्ण होणार: 31 मार्च 2025
  • भरती ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र (त्या-त्या जिल्हा, तालुका निहाय)
  • अंगणवाडी जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज कोठे करावा? : तालुका किंवा मनपा स्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ICDS) यांच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती येथे पाहा

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस १८,००० जागांसाठी भरतीची संपूर्ण माहिती येथे पाहा

अधिकृत वेबसाईट : https://icds.gov.in/

महिला व बालकल्याण योजनांवर भर

  • अनाथ बालकांच्या पुनर्वसन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केली जाणार.
  • गर्भाशय मुखाचा कर्करोग लसीकरण उपक्रम आरोग्य विभागाच्या समन्वयाने राबवला जाणार.
  • भिक्षेकरी गृहांच्या दुरुस्तीसाठीही निधीची तरतूद केली जाणार.

लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट! पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा!

लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख जाहीर!

अभिमानाचा क्षण! अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती उत्सवाचा ऐतिहासिक निर्णय

“अंगणवाडी केंद्र” केवळ शिक्षणाचे ठिकाण नसून, ते मुलांना पोषण आणि संस्कार देणारे केंद्र ठरावे, यासाठी महिला व बालविकास विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या राजाच्या ज्वलंत इतिहासाचे संस्कार बालकांच्या मनावर रुजावेत म्हणून राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची दखल घेत महामहीम राज्यपाल महोदयांनी आपल्या अभिभाषणात याचा उल्लेख केला, ही खरोखर अभिमानास्पद बाब आहे!

शिक्षण विभागाचे कामकाज होणार ऑनलाईन

राज्यात स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती होणार

कुपोषणाचे प्रमाण जास्त असलेल्या 11 जिल्ह्यात विविध उपयोजना राबविण्यात येत आहेत. कुपोषण आणि ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागांमध्ये विशेष उपक्रम राबविण्यात येईल. मागणीनुसार व आवश्यकतेप्रमाणे राज्यात स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बाल संगोपन योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत देण्यात येईल. भिक्षेकरी गृहांच्या दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल.

राज्यातील अंगणवाड्यांना आधुनिक आणि आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतरित करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 2430 स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या किट्समुळे अंगणवाड्यांमध्ये शिक्षण आणि पोषणाच्या सेवा अधिक प्रभावी होतील.

 राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय! सरकारकडून मोठा खुलासा!

स्मार्ट अंगणवाडीमुळे काय बदल होणार?

पूर्व-प्राथमिक शिक्षण – मुलांसाठी आनंददायी आणि आधुनिक शिक्षण प्रणाली
आरोग्य आणि पोषण आहार – संतुलित आहार आणि आरोग्य सेवा
महिला व किशोरवयीन मुलींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण

अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता, आणि आता त्याच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी: शासन निर्णय पाहा

महिला, बालक आणि अंगणवाडी सेविकांच्या सशक्तीकरणासाठी शासन वचनबद्ध असून, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. (Anganwadi Sevika Madatnis Bharti Pay Hike)

फेब्रुवारी, मार्च हप्ता जमा होणार, पण ‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एकरकमी लाभ वितरित

महाराष्ट्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे यासंबंधीच्या एकरकमी लाभ वितरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुख्य मुद्दे

🔹 दिनांक 01 एप्रिल 2022 नंतरच्या प्रकरणांना या योजनेचा लाभ मिळणार.
🔹 12.50 कोटी रुपये इतक्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे.
🔹 हे लाभ एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत वितरित केले जातील.
🔹 संबंधित लाभार्थ्यांना लवकरच रक्कम मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.

महत्वाचे निर्देश

👉 संबंधित प्रकरणांची योग्य छाननी करून आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या मार्फत लाभ मंजूर केला जाईल.
👉 या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे.

ही योजना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

अधिक माहितीसाठी: शासन निर्णय पाहा

Leave a Comment

error: Content is protected !!