Aple Sarkar Seva Kendra New Rules: राज्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी सुधारित निकष आणि सेवा दर लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
Table of Contents
Aple Sarkar Seva Kendra New Rules
राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा जलदगतीने आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र (Aple Sarkar Seva Kendra) स्थापन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ, निधी आणि श्रम वाचवता येईल.
नवीन सुधारित निकषानुसार सेवा केंद्रे
- ग्रामपंचायत क्षेत्रातील केंद्रे
- 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत – 2 सेवा केंद्रे
- 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत – 4 सेवा केंद्रे
- शहरी भागातील केंद्रे
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 12,500 लोकसंख्येसाठी – 2 सेवा केंद्रे
- इतर महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रात 10,000 लोकसंख्येसाठी – 2 सेवा केंद्रे
- प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात – 2 सेवा केंद्रे
- 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीत – 4 सेवा केंद्रे
Aple Sarkar सुधारित सेवा दर व शुल्क
नवीन सुधारित सेवा दरानुसार, सेवा शुल्क ५० रुपये असेल, ज्याचे विभागणी पुढीलप्रमाणे असेल:
- राज्य सेतू केंद्राचा वाटा: ₹2.50 (5%)
- महआयटीचा वाटा: ₹10 (20%)
- जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा: ₹5 (10%)
- आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा (VLE): ₹32.50 (65%)
घरपोच सेवा सुविधा
नागरिकांची सोय लक्षात घेऊन घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक घरपोच भेटीसाठी ₹100 (कर वगळून) शुल्क आकारण्यात येईल. या शुल्काचे विभागणी पुढीलप्रमाणे होईल:
- महाआयटीचा सेवा दर: 20%
- आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा: 80%
शासकीय सेवा अधिक सुलभ आणि गतिमान
या सुधारित धोरणामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि जलद उपलब्ध होतील. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच शासनाच्या डिजिटल सेवांना चालना मिळेल.
आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल!
आपले सरकार अधिकृत वेबसाईट: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/