Ativrushti Nuksan Bharpai: महाराष्ट्र शासनाने (महसूल व वन विभाग) राज्यातील सप्टेंबर २०२५ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी (Input Subsidy) स्वरूपात भरीव आर्थिक मदत जाहीर केली आहे. दोन स्वतंत्र शासन निर्णयांद्वारे एकूण ९९८ कोटी ६५ लाख २९ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई – तपशीलवार माहिती
मंजूर निधी आणि बाधित जिल्हे
सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी, पूर आणि सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी महाराष्ट्र शासनाने एकूण ₹ ९९८.६५ कोटी (रु. ९१३,४१,१६,०००/- आणि रु. ८५,२४,१३,०००/-) निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
२९ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार निधी
- मंजूर निधी: ₹ ९१३,४१,१६,०००/- (रूपये नऊशे तेरा कोटी एकेचाळीस लक्ष सोळा हजार फक्त).
 - बाधित जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा.
 - आपत्तीचे स्वरूप: अतिवृष्टी व पूर.
 
३० ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार निधी
- मंजूर निधी: ₹ ८५,२४,१३,०००/- (रूपये पंच्याऐंशी कोटी चोवीस लक्ष तेरा हजार फक्त).
 - बाधित जिल्हे: यवतमाळ, वाशिम व सोलापूर.
 - आपत्तीचे स्वरूप: अतिवृष्टी, पूर व सततचा पाऊस.
 
Ativrushti Nuksan Bharpai बाधित शेतकरी संख्या आणि क्षेत्र (०-२ हेक्टर मर्यादेत)
मदत ०-२ हेक्टर मर्यादेत शेतीपिक नुकसानीसाठी दिली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विभाग (२९.१०.२०२५ च्या निर्णयानुसार):
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा: ६,४४,६४९ बाधित शेतकरी आणि ५,१९,४६४.७४ हेक्टर बाधित क्षेत्र.
 - जालना जिल्हा: ५,४५,८९० बाधित शेतकरी आणि ३,८०,२६३.०३ हेक्टर बाधित क्षेत्र.
 - एकूण विभाग: ११,९०,५३९ बाधित शेतकरी आणि ८,९९,७२७.७७ हेक्टर बाधित क्षेत्र.
 
नागपूर विभाग (२९.१०.२०२५ च्या निर्णयानुसार):
वर्धा जिल्हा: ७२,२६० बाधित शेतकरी आणि ८९,९८३.३९ हेक्टर बाधित क्षेत्र.
राज्यातील एकूण (२९.१०.२०२५ च्या निर्णयानुसार): १२,६२,७९९ बाधित शेतकरी आणि ९,८९,७११.१६ हेक्टर बाधित क्षेत्र.
अमरावती विभाग (३०.१०.२०२५ च्या निर्णयानुसार):
- यवतमाळ जिल्हा: ३३,४८७ बाधित शेतकरी आणि ३८,९९३.४८ हेक्टर बाधित क्षेत्र.
 - वाशिम जिल्हा: ३८,७३४ बाधित शेतकरी आणि ४२,१८७.५६ हेक्टर बाधित क्षेत्र.
 - एकूण विभाग: ७२,२२१ बाधित शेतकरी आणि ८१,१८१.०४ हेक्टर बाधित क्षेत्र.
 
पुणे विभाग (३०.१०.२०२५ च्या निर्णयानुसार):
सोलापूर जिल्हा: १४,७९८ बाधित शेतकरी आणि १४,९०७.१५ हेक्टर बाधित क्षेत्र.
राज्यातील एकूण (३०.१०.२०२५ च्या निर्णयानुसार): ८७,०१९ बाधित शेतकरी आणि ९६,०८८.१९ हेक्टर बाधित क्षेत्र.
मदत वितरणाचे नियम व अटी
- शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी (Input Subsidy) थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT पोर्टलद्वारे) वितरित केली जाईल.
 - एका हंगामात एकाच वेळेस विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करण्यात यावी.
 - मदत देताना कोणत्याही लाभार्थ्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आले आहेत.
 - बँकांनी शेतकऱ्यांना मिळालेला मदतीचा निधी कर्ज खात्यात किंवा इतर वसुलीसाठी वळवू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.
 - ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार (२७.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार) आणि २ हेक्टर मर्यादेतील शेतीपिक नुकसानीसाठी असणार आहे.
 
अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय
- अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय 1
 - अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय 2
 




