अंशकालीन निदेशकांच्या थकीत मानधनासाठी निधी वितरीत; शासन निर्णय निर्गमित

Published On: February 9, 2026
Follow Us
Anshkalin Nideshak Salary Maharashtra

Anshkalin Nideshak Salary Maharashtra: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण यांसारख्या विषयांसाठी कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकांच्या थकीत मानधनासाठी निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ९ फेब्रुवारी २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

अंशकालीन निदेशकांच्या थकीत मानधनासाठी निधी वितरीत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन निदेशकांचे मानधन मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते. या सर्व निदेशकांच्या मानधनासाठी एकूण २३ कोटी ४८ लाख ९२ हजार रुपयांचा निधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सुपूर्द करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हा निधी ‘कंत्राटी सेवा’ या लेखाशिर्षाखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्रातील उच्च प्राथमिक शाळांमध्ये ‘अंशकालीन निदेशक’ (Anshkalin Nideshak) कार्यरत आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

हा निधी मंजूर करण्यामागे मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निकाल कारणीभूत ठरला आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या अंशकालीन निदेशकांना जून २०२५ पासून मानधन मिळालेले नव्हते.

याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या मानधनासाठी ‘स्वतंत्र लेखाशीर्ष’ उपलब्ध नव्हते. यासंदर्भात श्रीमती गायत्री मुळे व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका (क्र. १२६२९/२०२५) दाखल केली होती. न्यायालयाने २३ जानेवारी २०२६ रोजी आदेश देत थकीत मानधन अदा करण्याचे निर्देश दिले होते.

त्यामुळेच, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि निदेशकांना दिलासा देण्यासाठी (Anshkalin Nideshak Salary Maharashtra) वितरीत करण्याबाबत शासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

अंशकालीन निदेशक विविध तांत्रिक कारणांमुळे आणि उशिरा रुजू झाल्यामुळे रखडलेल्या मानधनासाठी

Anshkalin Nideshak Maharashtra: आकडेवारी आणि निधीचे विभाजन

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सद्यस्थितीत हजारो निदेशक कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी निधीची आवश्यकता खालीलप्रमाणे होती.

जिल्हा परिषद शाळा: २,८२४ अंशकालीन निदेशक कार्यरत असून त्यांच्यासाठी सुमारे ४२.८५ कोटी रुपयांची आवश्यकता होती.

महानगरपालिका/नगरपालिका शाळा: ७०५ अंशकालीन निदेशक कार्यरत असून त्यांच्यासाठी सुमारे १०.६३ कोटी रुपयांची आवश्यकता होती.

एकूण ३५२९ निदेशकांसाठी ५३.४८ कोटी रुपयांची गरज होती, ज्यापैकी ३० कोटी रुपये यापूर्वीच (२० ऑक्टोबर २०२५ रोजी) वितरीत करण्यात आले होते. आता उर्वरित २३.४८ कोटी रुपये वितरीत करण्यास मंजुरी मिळाली आहे.

निधी थेट बँक खात्यात जमा होणार

या शासन निर्णयामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये म्हणून अंशकालीन निदेशकांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे.

शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांनी हा निधी संबंधित जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना वितरीत करावा. विशेषतः महानगरपालिका क्षेत्रातील निदेशकांना विहित कालावधीत आणि तात्काळ मानधन मिळेल याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे अनुदान सशर्त असून ते ज्या कारणासाठी मंजूर केले आहे, त्याचसाठी खर्च करणे बंधनकारक आहे.

अंशकालीन निदेशक म्हणजे काय?

अनेकदा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की अंशकालीन निदेशक म्हणजे काय? तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा) उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आणि कार्यानुभव अशा विषयांचे शिक्षण देण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेले हे निदेशक असतात. ‘अंशकालीन निदेशक माहिती‘ पाहिली असता, त्यांची नियुक्ती शाळा व्यवस्थापन समितीद्वारे केली जाते आणि त्यांना शासनाकडून मानधन दिले जाते.

अंशकालीन निदेशकांसाठी, विशेषतः ज्यांचे वेतन जून २०२५ पासून रखडले होते, त्यांच्यासाठी हा ‘अंशकालीन निदेशक शासन निर्णय‘ अत्यंत महत्त्वाचा आहे. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे का होईना, पण अखेर निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाने हा निधी याच आर्थिक वर्षात खर्च करावा आणि उपयोगिता प्रमाणपत्र एका महिन्यात सादर करावे, अशा सक्त सूचनाही दिल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील ३५०० हून अधिक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी : अंशकालीन निदेशकांच्या थकीत मानधनासाठी निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

contract teacher

कंत्राटी शिक्षकांना मोठा दिलासा! या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार, शासन निर्णय डाउनलोड करा

May 28, 2026
samagra-shiksha-abhiyan-maharashtra-future-plan-guidelines-2026

‘समग्र शिक्षा’ योजनेच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

April 5, 2026
NHM Contractual Employees Services

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू – मंत्री प्रकाश आबिटकर

March 23, 2026
Contractual Health Workers Regularization

राज्यातील या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेणार का? सरकारकडून मोठा खुलासा!

March 23, 2026
PMMVY Contractual Employees Regularization

PMMVY योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आरोग्य योजनेत समायोजन करण्याबाबत – तारांकित प्रश्न

March 12, 2026
samagra-shiksha-contract-employee-regularization

एकच नारा – शासन सेवेत कायम करा! समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदनावर

March 9, 2026

Leave a Comment