अतिरिक्त शिक्षक समायोजन 2025-26: वेळापत्रक जाहीर! पहा जिल्हा व विभाग स्तरावरील संपूर्ण प्रक्रिया

Published On: February 8, 2026
Follow Us
Sanch Manyata Atirikt Shikshak Samayojan 2025-26

Sanch Manyata Atirikt Shikshak Samayojan: शिक्षण संचालनालयाने (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अतिरिक्त शिक्षक समायोजन परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकानुसार सन २०२५-२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचे वेळापत्रक आणि कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे.

न्यायालयीन स्थगिती उठवली: समायोजनाचा मार्ग मोकळा

गेल्या काही काळापासून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेवर स्थगिती होती. मात्र, आता ही स्थगिती उठवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका क्र. ५४५६/२०२५ आणि इतर याचिकांचा निकाल १४ नोव्हेंबर २०२५ रोजी लागल्याने, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता शासनाने समायोजन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रक्रियेचा मुख्य आधार हा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय आणि (Sanch Manyata Atirikt Shikshak Samayojan) संदर्भातील सुधारित कार्यपद्धती हा आहे.

काम नाही तर वेतन नाही हा नियम रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय! अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा!

संच मान्यता आणि अतिरिक्त ठरविण्याची प्रक्रिया

सन २०२५-२६ ची संच मान्यता ही २३ ऑक्टोबर २०२५ च्या विद्यार्थी संख्येच्या (आधार वैध) आधारावर तयार करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये ही संच मान्यता शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली होती. आता या संच मान्यतेनुसार जे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत, त्यांचे समायोजन विहित मुदतीत पूर्ण करायचे आहे.

शिक्षक अतिरिक्त ठरविण्याचे नियम आणि त्यापुढील समायोजन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. (Sanch Manyata Atirikt Shikshak Samayojan) प्रक्रियेअंतर्गत हे वेळापत्रक जिल्हा आणि विभाग स्तरावर राबवले जाईल.

अतिरिक्त शिक्षक समायोजन वेळापत्रक (२०२५-२६)

संचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार, अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल.

Sanch Manyata Atirikt Shikshak Samayojan Time Table date

वेतन आणि समायोजनाबाबत सुधारित सूचना

या परिपत्रकात एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरील समायोजन ३ मार्च २०२६ पर्यंत आणि विभाग स्तरावरील समायोजन २५ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण झाल्यानंतर, समायोजन झालेल्या शिक्षकांचे किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या मूळ शाळेतून काढले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

जर समायोजन झाल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन मूळ शाळेतून काढले गेले, तर त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशारा शिक्षण संचालकांनी दिला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षणाधिकारी यांनी वेळेत (Sanch Manyata Atirikt Shikshak Samayojan) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटींवर शासनाचा मोठा निर्णय!

शिक्षण संचालक (प्राथमिक) आणि शिक्षण संचालक (माध्यमिक) यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित झाले आहेत. शिक्षकांनी आणि शाळांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेल्या तारखांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी: अतिरिक्त शिक्षक समायोजन परिपत्रक डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Janganana Employees Leave Latest Circular

जनगणना 2027: शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द? परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश जारी

March 7, 2026
Shalarth Thakit Bill

Shalarth Thakit Bill: थकित देयके या तारखेपर्यंत निकाली निघणार, थकीत बिल किती मिळणार? चेक करा

March 5, 2026
Kendrapramukh Bhrati

केंद्रप्रमुख भरती परीक्षा निकालाची तारीख जाहीर? शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती

March 4, 2026
shikshaketar karmchari gazette 2026

राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी पात्रता बदलली! महाराष्ट्र शासन राजपत्र प्रसिद्ध

March 3, 2026
PM POSHAN aahar mandhan gr

PM POSHAN अंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांना वाढीव मानधनाचा लाभ मंजूर, शासन निर्णय जारी

March 3, 2026

शिक्षकांचे अशैक्षणिक कामातून सुटका होणार? शालेय शिक्षण राज्यमंत्री यांची विधानपरिषदेत माहिती

February 25, 2026

Leave a Comment