अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन आता ‘या’ पद्धतीने होणार, कागदपत्रांची यादी जाहीर

Published On: January 4, 2026
Follow Us
Teacher Adjustment Policy

Teacher Adjustment Policy: राज्यातील विशेष शाळा आणि कार्यशाळांमध्ये कार्यरत असलेल्या अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन (Teacher Adjustment Policy) करण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची अंतिम सूची जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर पाहूया. 

समायोजनासाठी वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा 

अनेकदा विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे किंवा काही कारणास्तव संस्थांचे मान्यता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे अनेक शिक्षक व कर्मचारी अतिरिक्त ठरतात. अशा कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत (Teacher Adjustment Policy) शासनाने आता स्पष्टता आणली असून, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची अंतिम सूची जाहीर केली आहे.

दिव्यांग कल्याण विभागाने २ जानेवारी २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, राज्यातील ज्या दिव्यांग शाळांची नोंदणी रद्द झाली आहे किंवा पटसंख्येअभावी जे कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत, त्यांच्या समायोजनासाठी जिल्हा स्तरावरून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. 

हे समायोजन पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी शासनाने तपासणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची एक ‘चेकलिस्ट’च आता निश्चित करून दिली आहे.

या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून आपल्या हक्काच्या नोकरीसाठी आणि समायोजनासाठी वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ही (Teacher Adjustment Policy) प्रभावीपणे राबवण्यासाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता, ज्याला आता मान्यता मिळाली आहे.

समायोजनासाठी कोणती कागदपत्रे तपासाली जाणार?

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी (मुंबईसाठी) हे अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव आयुक्त, दिव्यांग कल्याण (पुणे) यांच्याकडे पाठवतील. 

हा प्रस्ताव पाठवताना खालील महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती सादर करणे बंधनकारक असणार आहे.  शासनाने दिलेल्या नवीन फॉरमॅटनुसार, प्रस्तावात २८ रकान्यांची माहिती भरावी लागणार आहे. त्यातील काही प्रमुख बाबी खालीलप्रमाणे आहेत:

  • संस्थेची माहिती: संस्थेचे नाव, पत्ता आणि शाळेचे नाव.
  • मान्यता आदेश: मूळ नोंदणी प्रमाणपत्र, त्याचे नुतनीकरण आणि वैधता.
  • अनुदान स्थिती: शाळा १०० टक्के अनुदानित आहे की ५० टक्के? तसेच अनुदान मान्यता आदेश.
  • कर्मचाऱ्याची माहिती: कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम आणि तो ज्या पदावर आहे ते पद आकृतीबंधानुसार मंजूर आहे का?
  • नेमणूक तपशील: संस्थेचे नियुक्ती आदेश, सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता (Approval), आणि जाहिरात दिल्याची माहिती.
  • वैयक्तिक कागदपत्रे: जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र (Caste Validity), शैक्षणिक कागदपत्रे आणि बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल.
  • सेवा तपशील: सेवा पुस्तकाचे पहिले पान, सेवार्थ आयडी (Sevarth ID) आणि अंतिम वेतन प्रमाणपत्र.

विशेष म्हणजे, शाळा बंद पडताना तिचे नुतनीकरण चालू होते की नाही, आणि न्यायालयात काही प्रकरण प्रलंबित आहे का, याचीही शहानिशा या (Teacher Adjustment Policy) अंतर्गत केली जाणार आहे.

अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन आता ‘या’ पद्धतीने होणार 

संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा जिल्हा स्तरावरील यंत्रणेने ही सर्व माहिती विहित नमुन्यात भरून पुणे येथील आयुक्त कार्यालयाकडे पाठवायची आहे. त्यानंतर ३० डिसेंबर २०२५ च्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या ठिकाणी समायोजन केले जाईल.

अधिक माहितीसाठी : अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन चेकलिस्ट शासन निर्णय येथे डाउनलोड करा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment