BARTI Scheme: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत सन 2024-25 या वर्षाकरीता विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना https://www.barti.in/ या संकेतस्थळावरुन दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दि. 3 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार असून, विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.
BARTI Scheme : स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या दि. 30 ऑक्टोबर 2023 शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले.
त्यानुसार बार्टी (BARTI Scheme) मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच बँकिंग (IBPS), रेल्वे. एलआयसी, इ.व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षण व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण या विविध स्पर्धा परीक्षांचे खाजगी नामांकित व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्याना 13,000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी
Central Public Service Commission-Civil Service Examination Pre-Training : केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे रु.13,000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्याना 10,000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे रु.10,000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्याना 6000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी
बँकिंग (IBPS), रेल्वे, एलआयसी, इ. व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000 विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, https://www.barti.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे, प्रशिक्षणासाठी विद्यार्थी निवड ही ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे होणार असल्याचेही बार्टीचे महासंचालक श्री. वारे यांनी सांगितले आहे.
आवश्यक पात्रता
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराचे वय व शिक्षण संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा) तसेच पोलीस व मिलिटरी भरती व बैंक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी या व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या अटी व शर्ती नुसार असावे.
- रु. ८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल.
- अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
- उमेदवार दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.
आरक्षण
महिला ३०%, दिव्यांग (PWD) ५%, अनाथ-१%, वंचित-५% (वाल्मिकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी, इ. साठी), जागा आरक्षित असतील.
विद्यार्थी निवडीचे निकष
सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test- CET) द्वारे प्राप्त गुणांच्या आधारे केली जाईल.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक: ३ जुलै २०२४
इच्छुक व पात्र उमेदवारांनी http://trtipune.in/bartregmay24/ लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी वरील उपलब्ध लिंक वरील मार्गदर्शक सूचना वाचून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
सविस्तर जाहिरात : येथे पाहा
अधिकृत वेबसाईट: https://www.barti.in/
अर्ज भरताना तांत्रिक अडचणी आल्यास helpdesk schemebarti@ gmail.com या ईमेल वर संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक : ०२०-२६३४३६००/२६३३३३३०/२६३३३३३९
Khup chhan sandhi aahe .mala hi sandhi havi aahe
Main Naukari karna chahti hun