मुंबई उच्च न्यायालय, तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठांच्या आस्थापनेवर ‘शिपाई/हमाल/फराश’ या पदांसाठी 5 वर्षांसाठी निवड यादी आणि 2 वर्षांसाठी प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास आवश्यक अटी व निकष पूर्ण करणे गरजेचे आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहेत.
रिक्त पदांचा तपशील
एकूण रिक्त पदे (सद्यस्थितीत + पुढील 2 वर्षांत रिक्त होणारी)
दिव्यांगासाठी आरक्षण पदे (4%)
- उच्च न्यायालय, मुंबई (मुख्यालय) 570
- नागपूर खंडपीठ 115
- औरंगाबाद खंडपीठ 202
- एकुण : 887

वेतन: शिपाई/हमाल/फराश पदासाठी नियमाप्रमाणे वेतन मॅट्रिक्स एस-3 (₹15,600 – ₹52,400) आणि नियमाप्रमाणे भत्ते लागू असतील.
नोंद: दिव्यांगांसाठी राखीव असलेली पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतर निकट भविष्यात भरण्यात येतील.
आवश्यक पात्रता
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत-कमी सातवी पास असावा.
वयोमर्यादा (दिनांक 08/12/2025 रोजी)
- खुला प्रवर्ग: किमान 18 वर्षे, कमाल 38 वर्षे.
- मागासवर्गीय (अ.जा., अ.ज., इ.मा.व., वि.मा.व.): किमान 18 वर्षे, कमाल 43 वर्षे.
- न्यायालयीन/शासकीय कर्मचारी: किमान 18 वर्षे, कमाल वयोमर्यादा लागू नाही.
इतर महत्त्वाच्या अटी
- उमेदवार भारताचा नागरिक आणि महाराष्ट्र राज्याचा अधिवासी (Domicile) असावा.
- उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी.
- उमेदवाराला मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहीता येणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, 2005 नुसार, अर्ज करण्याच्या दिनांकास उमेदवारास हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी (28 मार्च 2005 व तद्नंतर जन्मलेल्या मुलांमुळे).BMC Peon Recruitment ही एक चांगली संधी आहे.
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज लिंक सुरु होण्याची तारीख : 15/12/2025 रोजी सकाळी 11:00 वाजताऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 05/01/2026 रोजी संध्याकाळी 5:00 वाजता
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवारांनी https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अर्ज सादर करावा.
उमेदवाराने अर्ज करताना फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी (मुंबई मुख्यालय, नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ). एकदा निवड केल्यानंतर बदल स्वीकारला जाणार नाही.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी SBI Collect द्वारे ₹1000/- परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. फी भरल्यानंतर प्राप्त झालेला SB Collect Reference Number ऑनलाईन अर्जात अचूक नमूद करणे अनिवार्य आहे.
BMC Peon Recruitment साठी अर्ज भरताना उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांनुसार अचूक माहिती भरावी. अर्ज भरल्यानंतर उमेदवाराला कोणताही बदल करता येणार नाही.
अधिक माहितीसाठी
निवड प्रक्रिया
शिपाई/हमाल/फराश पदासाठी निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल.
- लेखी परीक्षा : 30 गुण स्वरूप : वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न (Objective type multiple choice questions). उत्तीर्ण होण्यासाठी किमान 15 गुण आवश्यक
- शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता : 10 गुण
- मुलाखत : 10 गुण
महत्वाचे
लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेस बोलवण्यात येणार नाही.
उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणी आणि मुलाखतीत मिळविलेल्या एकूण गुणांच्या (Merit) आधारे केली जाईल.
केवळ अर्ज दाखल केल्याने मुलाखतीचा किंवा नेमणुकीचा हक्क प्रस्थापित होणार नाही.या BMC Peon Recruitment प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकार उच्च न्यायालय प्रशासनाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत. उमेदवारांनी वेळापत्रकासाठी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी लक्ष ठेवावे.



