Bped Mped Cap Registration 2025 राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता शारीरिक शिक्षण पदवी (B.P.Ed.) आणि शारीरिक शिक्षण पदव्युत्तर पदवी (M.P.Ed.) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे (CAP) नोंदणी वेळापत्रक जाहीर केले आहे. इच्छुक उमेदवारांना दिलेल्या तारखांमध्ये ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Bped Mped Cap Registration 2025
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
- ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरणे: महाराष्ट्र राज्यातील (MS) आणि बाहेरील (OMS) उमेदवार दिनांक ३ जुलै २०२५ ते १३ जुलै २०२५ या कालावधीत ‘कॅप’साठी नोंदणी करून अर्ज भरू शकतील.
- ई-पडताळणी (E-Scrutiny): उमेदवारांनी अपलोड केलेली कागदपत्रे आणि भरलेल्या अर्जांची ई-पडताळणी समितीमार्फत ३ जुलै २०२५ ते १८ जुलै २०२५ या काळात केली जाईल.
ही सूचना राज्य सीईटी सेलचे आयुक्त आणि सक्षम अधिकारी यांनी जारी केली आहे. ‘कॅप’ प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच www.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल, असेही या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
