Cabinet Meeting Approves New Posts : राज्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, त्यासाठी 364 पदांना मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
Table of Contents
नवीन ३६४ पदांना राज्य सरकारची मंजुरी
राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे.
या फोर्ससाठी (Cabinet Meeting Approves New Posts) आवश्यक असणारे ३४६ पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी ३१० पदे नियमित असतील तर ३६ पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.
- एकूण पदे: 364
- नियमित पदे: 310
- बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी पदे: 36
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या ३७१ पदांची या जिल्ह्यात भरती!
नियमित पदांचा तपशील (पदनाम आणि संख्या)
- विशेष पोलीस महानिरीक्षक: 1
- पोलीस उपमहानिरीक्षक: 1
- पोलीस अधीक्षक: 3
- अपर पोलीस अधीक्षक: 3
- पोलीस अधीक्षक: 10
- पोलीस निरीक्षक: 15
- सहाय्यक पोलीस निरीक्षक: 15
- पोलीस उपनिरीक्षक: 20
- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक: 35
- पोलीस हवालदार: 48
- पोलीस शिपाई: 83
- चालक पोलीस हवालदार: 18
- चालक पोलीस शिपाई: 32
- कार्यालय अधीक्षक: 1
- प्रमुख लिपीक: 2
- वरिष्ठ श्रेणी लिपीक: 11
- कनिष्ठ श्रेणी लिपीक: 7
- उच्च श्रेणी लघुलेखक: 2
- निम्न श्रेणी लघुलेखक: 3
भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी
बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे (पदनाम आणि संख्या)
- वैज्ञानिक सहाय्यक: 3
- विधी अधिकारी: 3
- कार्यालयीन शिपाई: 18
- सफाईगार: 12
मनुष्यबळाच्या खर्चास मान्यता
यासाठी येणाऱ्या आवर्ती खर्च रुपये १९, २४, १८,३८० रुपये (एकोणीस कोटी चोवीस लाख अठरा हजार तीनशे ऐंशी रुपये) तर वाहन खरेदीसह अनावर्ती खर्चास ३,१२,९८,००० ( तीन कोटी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये) मान्यता देण्यात आली.
- आवर्ती खर्च: 19,24,18,380 रुपये
- अनावर्ती खर्च (वाहन खरेदीसह): 3,12,98,000 रुपये
त्यामुळे आता लवकरच वरील पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, इच्छुक व पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 414 जागा, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
मंत्रिमंडळ बैठकीतील ‘इतर’ महत्वाचे निर्णय
- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा
- अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती (Cabinet Meeting Approves New Posts) व त्यासाठीच्या खर्चास मान्यता
- सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता.
- राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता
- जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा
- पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी
कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महत्त्वाची बैठक संपन्न
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या ३७१ पदांची या जिल्ह्यात भरती!
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!