गुड न्यूज! कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनासाठी 45,000 रुपये प्रमाणे निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Published On: June 9, 2024
Follow Us
Contract Basis Employees Salary

Contract Basis Employees Salary : महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनासाठी प्रतिमाह रु. ४५,००० प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे.

Contract Basis Employees Salary

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक – ६ पदे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- ३६ पदे असे एकूण ४२ पदे कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आली आहेत.

सदर पदांना दि. २ नोव्हेंबर, २०२३ ते दि. ३० सप्टेंबर, २०२४ या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या ६ विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व ३६ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अशा एकूण ४२ पदांचे प्रतिमाह रु. ४५,०००/- याप्रमाणे माहे मार्च, २०२४ ते जून २०२४ या ४ महिन्यांचे एकूण रु. ७५,६०,०००/- (रुपये पंचाहत्तर लक्ष साठ हजार फक्त) इतके मानधन अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BDS) आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यात आले आहे. (शासन निर्णय)

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment