केंद्र सरकारच्या नियमानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या – कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश Contract Emplyoee Minimum Wages

By Marathi Alert

Updated on:

Contract Emplyoee Minimum Wages : महामेट्रोअंतर्गत नागपूर मेट्रो रेल, नागपूर येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार प्रविण दटके,  कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटना तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

नागपूर मेट्रो रेल्वेमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या किमान वेतनानुसार वेतन द्यावे, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महामेट्रो व्यवस्थापनाला दिले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी! किमान वेतनात मोठी वाढ

महामेट्रो कंत्राटी कामगारांच्या वेतनासाठी ठोस पावले

महामेट्रोमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांची नोंदणी केंद्रीय कामगार प्राधिकरण तसेच राज्य शासनाच्या कामगार विभागाकडे झाली आहे. मात्र, अद्याप त्यांना शासनाने निर्धारित केलेल्या वेतनाच्या तुलनेत न्याय मिळत नसल्याची बाब समोर आली.

कामगार मंत्री फुंडकर यांनी महामेट्रो व्यवस्थापनाला स्पष्ट निर्देश दिले की, सर्व कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे आणि तातडीने कार्यवाही करावी.

अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

राज्यातील मेट्रो कामगारांसाठी 一 वेतन धोरण येणार?

श्री. फुंडकर यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या एमएमआरडीए, एमआरसीएल, पीएमआरडीए या मेट्रो प्रकल्पांमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांच्या वेतनात एकसंधता असावी. त्यासाठी त्यांना समान वेतन (Contract Emplyoee Minimum Wages) प्रवाहात आणले जाईल.

महामेट्रो कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार, अशी माहितीही कामगार मंत्री फुंडकर यांनी दिली.

कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महत्त्वाची बैठक संपन्न

MarathiAlert.com वर आम्ही तुम्हाला अचूक, उपयुक्त आणि विश्वसनीय माहिती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नोकरीच्या जाहिराती आणि कर्मचारी अपडेट्स यांसारख्या विविध विषयांवर लेख लिहण्याचा आमचा 6 वर्षाचा अनुभव आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!