दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदानात मोठी वाढ; आता मिळणार 2.5 लाखांपर्यंत मदत, शासन निर्णय जारी

By MarathiAlert Team

Published on:

Divyang Vivah Yojana Maharashtra: महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेच्या रक्कमेत घसघशीत वाढ करण्यात आली असून, आता विवाहित जोडप्यांना २.५० लाखांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे.

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी दिव्यांग व्यक्ती विवाहाचा विचार करत असेल, तर ही माहिती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर मग, या दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत काय बदल झाला?

पूर्वी या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम कमी होती आणि ती फक्त दिव्यांग आणि अव्यंग (सुदृढ) व्यक्तीच्या विवाहासाठी मर्यादित होती. मात्र, आता १८ डिसेंबर २०२५ च्या नवीन आदेशानुसार दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:

अनुदानात वाढ: दिव्यांग आणि अव्यंग व्यक्तीच्या विवाहासाठी मिळणारी रक्कम आता १ लाख ५० हजार रुपये करण्यात आली आहे.

नवीन वर्गवारी: आनंदाची बाब म्हणजे, आता ‘दिव्यांग आणि दिव्यांग’ (दोघेही दिव्यांग) यांचा विवाह झाल्यास त्यांना २ लाख ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाईल.

शासनाने हे पाऊल उचलल्यामुळे Divyang Vivah Yojana Maharashtra आता अधिक व्यापक झाली असून, दिव्यांग जोडप्यांना त्यांच्या संसाराची सुरुवात करण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

अर्थसहाय्याचे स्वरूप कसे असेल?

मिळालेली रक्कम ही पती आणि पत्नीच्या ‘संयुक्त बँक खात्यावर’ थेट जमा (DBT) केली जाईल. मात्र, भविष्यातील सुरक्षिततेसाठी मिळालेल्या रकमेपैकी ५०% रक्कम ही ५ वर्षांसाठी ‘फिक्स डिपॉझिट’ (Fixed Deposit) म्हणून ठेवावी लागेल आणि उर्वरित रक्कम तुम्ही वापरू शकता.

लाभ मिळवण्यासाठी अटी काय आहेत? (Eligibility Criteria)

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
  • वधू किंवा वर यांच्याकडे किमान ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे वैध ‘UDID कार्ड’ असणे बंधनकारक आहे.
  • जोडप्यापैकी किमान एक व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावी.
  • हा विवाह दोघांचाही ‘प्रथम विवाह’ असावा. (जर घटस्फोटित असतील तर त्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा) .
  • विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत (Registered Marriage) असणे आवश्यक आहे.
  • लग्नानंतर १ वर्षाच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे.

दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना अर्ज कसा आणि कुठे करायचा?

Divyang Vivah Yojana Maharashtra चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील ‘जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी’ यांच्याकडे अर्ज करावा लागेल.

Divyang Vivah Yojana Maharashtra PDF अर्जाचा नमुना खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वरील शासन निर्णयासोबत जोडला असून, अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतील.

  • UDID दिव्यांग प्रमाणपत्र.
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
  • दोघांचे आधार कार्ड.
  • पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्याचा तपशील (पासबुक झेरॉक्स).
  • महाराष्ट्राचे डोमिसाईल (रहिवासी) प्रमाणपत्र .

तुमचा अर्ज जिल्हा कार्यालयात जमा झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याची छाननी केली जाईल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यांचे कौटुंबिक आयुष्य सुखकर व्हावे आणि त्यांच्या लग्नाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, या उदात्त हेतूने शासनाने हा निर्णय घेतला आहे. तरी, जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या Divyang Vivah Yojana Maharashtra चा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करावी.

अधिक माहितीसाठी : अर्जाचा नुमना PDF शासन निर्णय येथे डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!