GDS Recruitment 2025 : भारतीय डाक विभागात ‘जिडीएस’ पदांच्या तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

By Marathi Alert

Updated on:

GDS Recruitment 2025 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 साठी 21 हजार 413 रिक्त पदांसाची जाहिरात www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी ही एक चांगली सुवर्णसंधी आहे. या भरतीअंतर्गत ब्रँच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

GDS Recruitment 2025 भरतीचा संपूर्ण तपशील

Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement Schedule-I, January-2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव Gramin Dak Sevak (GDS)

  1. ब्रँच पोस्टमास्तर (BPM)
  2. असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (ABPM)
  • एकूण पदे: 21,413
  • शैक्षणिक पात्रता: दहावी (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • निवड प्रक्रिया: मेरिट लिस्टद्वारे निवड
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

आवश्यक पात्रता निकष

वयोमर्यादा

  • किमान: 18 वर्षे
  • कमाल: 40 वर्षे
  • SC/ST साठी 5 वर्षे सवलत, OBC साठी 3 वर्षे, PwD साठी 10 वर्षे

शैक्षणिक पात्रता

  • 10वी उत्तीर्ण (गणित आणि इंग्रजी विषयासह)
  • स्थानिक भाषा (मराठी) 10 वी पर्यंत शिकलेली असावी.

इतर आवश्यक पात्रता

  • संगणक ज्ञान असणे आवश्यक.
  • सायकल चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक.

आरोग्य विभागाचा मोठा निर्णय! नवीन आरोग्य सेवा केंद्रे आणि २,०७० नवीन पदनिर्मितीस मान्यता, शासन निर्णय

पगार आणि भत्ते

  • BPM: ₹12,000/- ते ₹29,380/- प्रति महिना
  • ABPM/डाक सेवक: ₹10,000/- ते ₹24,470/- प्रति महिना
  • वार्षिक 3% वाढ लागू.

GDS Recruitment 2025 रिक्त पदांचा तपशील

GDS Recruitment 2025

अर्ज कसा करावा? GDS Recruitment 2025

📝 अधिकृत संकेतस्थळ: https://indiapostgdsonline.gov.in
✅ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
✅ फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक.
✅ SC/ST/PWD/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे.
✅ इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹100/- आहे.

भारतीय नौदलात भरती – शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) पदांची मोठी भरती

महत्त्वाच्या सूचना

  • वैयक्तिक माहिती जसे की मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि नोंदणी क्रमांक इतरांना शेअर करू नका.
  • कोणत्याही अवैध कॉल्स किंवा खोट्या ऑफरपासून सावध राहा.
  • अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://indiapostgdsonline.gov.in/

Gramin Dak Sevak Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ मार्च २०२५ – संधीचा लाभ घ्या!

मूळ जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज येथे करा

महत्वाच्या तारखा

  • नोंदणी व अर्ज प्रक्रिया: 10 फेब्रुवारी 2025 ते 03 मार्च 2025
  • सुधारणा विंडो (Edit/Correction): 06 मार्च 2025 ते 08 मार्च 2025

GDS पदाच्या कामाचे स्वरूप

ब्रँच पोस्टमास्तर (BPM)

  • शाखा पोस्ट ऑफिसचे दैनंदिन कार्यभार सांभाळणे.
  • इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) सेवा पुरवणे.
  • डाक विभागाच्या विविध सेवांचे विपणन आणि प्रचार करणे.
  • आवश्यकतेनुसार इतर पदांसोबत समन्वय साधून काम करणे.
  • निवड झाल्यास स्वतःच्या खर्चाने कार्यालयीन जागेची सोय करणे आवश्यक.

असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (ABPM)

  • टपाल सेवा, स्टॅम्प विक्री, व घरपोच पत्रांचे वितरण करणे.
  • ग्राहक सेवा केंद्रे (CSC) व्यवस्थापित करणे.
  • डाक विभागाच्या विविध योजनांचे प्रचार व व्यवहार पाहणे.
  • BPM च्या अनुपस्थितीत कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळणे.

डाक सेवक

  • टपाल कार्यालयात किंवा रेल्वे मेल सेवा (RMS) मध्ये कार्यरत राहणे.
  • टपाल पोचवणे, ट्रान्सपोर्टेशन आणि विविध पोस्टल ऑपरेशन्स हाताळणे.
  • पोस्टमास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जबाबदाऱ्या पार पाडणे.

अंगणवाडी मदतनीस आणि सेविका जाहिरात – रिक्त पदांचा तपशील

Leave a Comment

error: Content is protected !!