थेट मुलाखत! वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू GMC Jalgaon Asst Prof Recruitment

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Jalgaon Asst Prof Recruitment शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे सहायक प्राध्यापक संवर्गातील रिक्त पदे ३६४ दिवसांच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

GMC Jalgaon Asst Prof Recruitment

पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता:

  • Anatomy (शरीरशास्त्र): ०२ जागा
  • Physiology (शरीरक्रियाशास्त्र): ०२ जागा
  • Biochemistry (जैव-रसायनशास्त्र): ०२ जागा
  • Forensic Medicine (न्यायवैद्यकशास्त्र): ०१ जागा
  • Community Medicine (सामुदायिक वैद्यकशास्त्र): ०३ जागा
  • Dermatology, Venereology and Leprosy (त्वचारोग, रतिज व कुष्ठरोग): ०१ जागा
  • Ophthalmology (नेत्ररोग): ०१ जागा
  • General Medicine (सामान्य वैद्यकशास्त्र): ०१ जागा (संभाव्य रिक्त)
  • Obstetrics and Gynaecology (प्रसूती व स्त्रीरोग): ०१ जागा (संभाव्य रिक्त)

एकूण १४ जागांसाठी ही भरती असून, यात विविध विषयांचा समावेश आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद (NMC) च्या नियमांनुसार असेल. उमेदवारांकडे संबंधित विषयात एम.डी. किंवा एम.एस. पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, डीएनबी (DNB) उमेदवारांसाठी विशिष्ट अनुभव अटी लागू आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी: १६ जून २०२५ ते २५ जून २०२५ पर्यंत, सकाळी ११:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत (सुटीचे दिवस वगळून).
  • मुलाखतीची तारीख: ३० जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण: अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (परिषद हॉल).

अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवारांनी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.gmcjalgaon.org) किंवा वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर (www.med-edu.in) उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून घ्यावा. अर्ज पूर्ण भरून, सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रतींसह कार्यालयाच्या आवक-जावक शाखेत प्रत्यक्ष किंवा नोंदणीकृत डाकेने सादर करावा. ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

मानधन आणि अटी व शर्ती:

  • निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा रु. १,००,०००/- (एक लाख रुपये) इतके एकत्रित मानधन दिले जाईल.
  • वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षांपर्यंत, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४५ वर्षांपर्यंत शिथिलक्षम राहील.
  • गुणवत्ता यादी शैक्षणिक अर्हतेनुसार प्राप्त गुणांवर आधारित असेल आणि अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • इतर संस्थेत कार्यरत असलेल्या उमेदवारांनी ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक आहे.
  • ही नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची (३६४ दिवसांसाठी) असेल आणि कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही हक्क राहणार नाही.
  • ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केले आहेत, त्यांना नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

रिक्त जागांची संख्या प्रशासकीय कारणास्तव बदलण्याचे अधिकार प्रशासनाकडे आहेत. तसेच, कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!