GMCJJH Recruitment 2025 महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने गट ड संवर्गातील 211 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागात ‘गट ड’ पदांची भरती सुरू; 211 पदांसाठी अर्ज मागवले
महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय अंतर्गत विविध रुग्णालये आणि संस्थांमध्ये गट ड (वर्ग-४) संवर्गातील एकूण २११ रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी ही शासकीय नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन (Computer Based Test) पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
ही भरती सरळसेवेने केली जाणार असून, उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे होईल. या भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
- अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किमान दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
- वयोमर्यादा (१ जुलै २०२५ पर्यंत):
- खुला प्रवर्ग: किमान १८ ते कमाल ३८ वर्षे.
- मागासवर्गीय: किमान १८ ते कमाल ४३ वर्षे.
- खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.
जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंकसाठी येथे क्लिक करा


