महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने गट ड संवर्गातील २११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
महत्वाच्या तारखा

परीक्षेचे स्वरूप
ही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना २०० गुणांची ऑनलाइन (CBT) परीक्षा द्यावी लागेल.
- परीक्षेचा कालावधी: १२० मिनिटे (२ तास).
- प्रश्नसंख्या: १०० प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला २ गुण).
- विषय: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी/अंकगणित.
- नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.१ गुण वजा केला जाईल.
- मुलाखत: या पदांसाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही.
- निवडीचा निकष: गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
अर्ज कसा कराल?
या गट ड भरती साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, परीक्षा आणि निवडीसंबंधी अधिक तपशील विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
उपयुक्त लिंक: अर्ज आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी gmcjjh.edu.in आणि www.med-edu.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.


