Government Recruitment: राज्यातील सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगामार्फत करण्यात यावी अशी विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ, ब आणि क दर्जाच्या पदांची भरती केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ओळखला जातो, विद्यार्थीवर्गात आयोगाची विश्वासार्हता खूप चांगली असून नुकतीच 8000 लिपिक पदांची भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबवून आयोगाने मोठ्या भरती प्रक्रिया राबविण्याची क्षमता सिद्ध केली आहे.
या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी अशी विनंती आमदार Abhimanyu Pawar यांनी उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
मोठी संधी! परदेशी शिष्यवृत्तीकरिता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द मा उपमुख्यमंत्री महोदयांनी दिला आहे. सर्व शासकीय नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा निर्णय झाल्यास शासकीय नोकरभरती (Government Recruitment) प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसुत्रता येईल असा विश्वास आहे. असे आमदार अभिमन्यू पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘या’ सरळसेवा भरती मध्ये 10 गुण अतिरिक्त मिळणार
Yes
Yes
comments