HSRP Number Plate: एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य; बुकिंग प्रक्रिया

By Marathi Alert

Published on:

HSRP Number Plate : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) सर्व वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे.

HSRP नंबर प्लेट का आवश्यक?

रस्त्यावरील वाहनांची ओळख पटवण्यासाठी, वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट – HSRP) बसवणे अनिवार्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • गुन्हेगारी कमी करण्यासाठी
  • वाहनांची ओळख पटवण्यासाठी
  • राष्ट्रीय सुरक्षेसाठी

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने 01.04.2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहेत. 01.04.2019 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांना ही प्लेट बसवणे बंधनकारक आहे. (HSRP Number Plate)

महाराष्ट्र शासनाचा निर्णय

नागरिकांच्या सुरक्षेसाठी, महाराष्ट्र शासनाने 01.04.2019 पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. (Hsrp Number Plate Maharashtra)

तुमच्या वाहन/RTO नुसार HSRP Booking Portal Link

मुंबई (मध्य) कार्यालयातील वाहनधारकांसाठी सूचना:

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट  बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी महिन्याचे पैसे ‘या’ दिवशी तुमच्या खात्यात जमा होणार

HSRP Number Plate Price In Maharashtra

राज्य सरकारने पारदर्शक प्रक्रियेद्वारे HSRP चे दर निश्चित केले आहेत. एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी महाराष्ट्रातील HSRP बसवण्याचा खर्च इतर राज्यांच्या सरासरी खर्चापेक्षा कमी आहे.

  • दोन चाकी वाहनांसाठी सरासरी खर्च 420 ते 480 रुपये असताना, महाराष्ट्रात तो 450 रुपये आहे.
  • चार चाकी वाहनांसाठी सरासरी खर्च 690 ते 800 रुपये असताना, महाराष्ट्रात 745 रुपये दर निश्चित केला आहे.
  • जड मोटार वाहनांसाठी सरासरी खर्च 800 रुपये पर्यंत आहे, तर महाराष्ट्रात तो 745 रुपये आहे.

HSRP प्लेट: आता जुन्या वाहनांसाठी पण आवश्यक! नियम, किंमत आणि अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

बुकिंग प्रक्रिया: HSRP Maharashtra Online Registration

अधिक माहितीसाठी राज्य परिवहन विभागाची अधिकृत वेबसाइट: https://transport.maharashtra.gov.in/

अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! फेब्रुवारी 2025 चे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

HSRP नंबर प्लेट न बसवल्यास काय होईल?

  • HSRP नंबर प्लेट न बसवल्यास वाहन मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, विमा अद्ययावत करणे यांसारखी कामे थांबवली जातील.
  • बनावट HSRP नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल.
  • तक्रारींसाठी सेवापुरवठादारांचे पोर्टल किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधा.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 01.04.2019 पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे नियमांचे पालन करा आणि तुमच्या वाहनासाठी अधिक सुरक्षित HSRP नंबर प्लेट त्वरित बसवा!

जुन्या गाड्यांसाठी ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट अनिवार्य! जाणून घ्या महाराष्ट्रातील नवीन नियम आणि दर

Leave a Comment

error: Content is protected !!