HSRP Number Plate Date Extended: दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविणे अनिवार्य असून, यासाठी अंतिम मुदत आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
HSRP Number Plate Date Extended
शासनाने १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी पाटीसाठी वेळ घेणे आवश्यक आहे. ही वेळ १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी घेतल्यास संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई होणार नाही.
यानंतर देखील एचएसआरपी पाटी बसवलेली नसलेली वाहने वायुवेग पथकांच्या तपासणीदरम्यान आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
वाहनधारकांनी मुदतीच्या आत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.
परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी या संदर्भात परिपत्रक काढून सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस व ट्रक संघटनांसोबत बैठक घेऊन यासंबंधी सर्वांना माहिती द्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
HSRP Number Plate म्हणजे काय?
HSRP चा Full Form: High Security Registration Plates असा आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) ही सरकारद्वारे अनिवार्य केलेली विशेष क्रमांक प्लेट आहे, जी वाहनांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे.
HSRP बसविणे का आवश्यक?
➡️ चोरी व बनावट नंबर प्लेट्सला आळा
➡️ वाहतूक व्यवस्थापन व ट्रॅकिंगसाठी उपयुक्त
➡️ नियमभंग झाल्यास वाहन सहज ओळखण्यास मदत
जुनी वाहने धारकांनी लवकरात लवकर अधिकृत HSRP केंद्रांवर जाऊन आपल्या वाहनावर उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवावी, अन्यथा मुदतीनंतर कारवाई होण्याची शक्यता आहे.
HSRP Number Plate Check Online Status
जर तुम्हाला तुमच्या वाहनाच्या HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेटचे ऑनलाइन स्टेटस तपासायचे असेल, तर खालील पद्धतींचा वापर करू शकता:
Maharashtra RTO Zone HSRP Number Plate
महाराष्ट्र राज्यातील HSRP Number Plate Registration करण्यासाठी HSRP Booking 3 Portal असून, RTO नुसार Maharashtra RTO Zone 1, 2,3 सविस्तर येथे पाहा आणि खाली दिलेल्या तुमच्या RTO झोन नुसार HSRP Number Plate Online Status Check करा.
HSRP नंबर प्लेट स्टेटस ऑनलाइन तपासण्याची प्रक्रिया
- सर्व प्रथम खाली दिलेल्या परिवहन वेबसाइटला भेट द्या.
- HSRP Booking Portal Link 1 : https://mhhsrp.com
- HSRP Booking Portal Link 2 : https://hsrpmhzone2.in
- HSRP Booking Portal Link 3 : https://maharashtrahsrp.com
- “HSRP Status” किंवा “Vehicle Registration Status” पर्याय निवडा.
- तुमचा वाहन क्रमांक (Vehicle Registration Number) व चेसिस क्रमांक (Chassis Number) टाका.
- सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या HSRP नंबर प्लेटची स्थिती दिसेल.
🚘 HSRP नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा स्थानिक RTO कार्यालयात चौकशी करा.
