Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित; सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी!

By MarathiAlert Team

Published on:

Ladki Bahin Yojana : नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या भगिनींचे अर्ज बाद झाले आहेत त्या भगिनींना सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
  2. जवळपास १ कोटी ६० लाख पेक्षा जास्त भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू झाला आहे. आणखीन १ कोटी भगिनींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.
  3. १ कोटी ६० लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण देशातील पहिली योजना असल्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात 1 कोटी 7 लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनींना अभिवादन करुन मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1 कोटी 7 लाख भगिनींच्या खात्यात लाभाची 3 हजार 225 कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

माझी लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन यादी येथे पाहा

दुसऱ्या टप्यात 52 लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा

दुसऱ्या टप्यात 52 लाख भगिनींच्या खात्यात 1562 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने 1 कोटी 60 लाख महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.

माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार, तसेच रकमेत वाढ होणार

राज्याच्या तिजोरीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळायलाच हवा. या योजनेच्या उत्तम अंमलबजावणीमुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या संबंधात कोणत्याही अपप्रचाराला महिलांनी बळी पडू नये. ही योजना भविष्यातही कायम स्वरुपी सुरु राहणार असून लाभाच्या रकमेत वाढ होणार आहे. सर्वसामान्य महिलांसाठी दीड हजार ही रक्कम मोठी आहे. या रकमेतून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळण्यास मोठी मदत होणार असून अर्थव्यवस्थेलाही या योजनेमुळे चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!