लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा! कोण पात्र, कोण अपात्र? यादी पहा Ladki Bahin Yojana February Installment Date

By Marathi Alert

Updated on:

Ladki Bahin Yojana February Installment Date : महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक मदतीचा आधार ठरली आहे. मात्र, या योजनेत काही अपात्र लाभार्थ्यांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने 2.63 लाख लाभार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीत कोण अपात्र ठरणार, कोणाला लाभ मिळणार आणि हप्ता कधी जमा होणार, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी सुरू!

सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, अपात्र लाभार्थ्यांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काही महिलांचे उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असूनही त्या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने २.६३ लाख लाभार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तपासणी दिनांक 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित शासन निर्णयातील पात्रतेच्या अटी व शर्तीनुसार करण्यात येत आहे.

2.52 कोटी महिलांना मिळणार आर्थिक मदत! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारने केला मोठा खुलासा!

लाडकी बहीण योजनेतून ‘या’ महिला अपात्र

  • सरकारी योजनेच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा Ladki Bahin Yojana महिला लाभयार्थ्याना या योजनेतून बाद करण्यात येत आहे. यामध्ये महिला व बालविकास विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2 लाख 30,000 महिला लाभार्थी यांना अपात्र करण्यात आले आहे.
  • तसेच कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी गाडी, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी किंवा स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या अशा 1 लाख 60 हजार महिला लाभार्थी यांना अपात्र करण्यात आले आहे.
  • वय 65 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या महिला 1 लाख 10 हजार लाभार्थी यांना अपात्र करण्यात आले आहे.
  • याव्यतिरिक्त आंतरराज्य विवाह केलेल्या महिला लाभार्थी, आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल त्या महिला लाभार्थी, एकच महिलेने दोन अर्ज केले असल्यास असे लाभार्थी यांना अपात्र करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजना: ‘रूपे कार्ड’ लाँच आणि ₹3000 जमा होण्याची नवीन तारीख जाहीर!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुधारित निकष येथे पाहा

या लाभार्थ्यांचा लाभ परत घेणार नाही!

लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी २०२५ पासून योजनेचा लाभ मिळणार नाही. (Ladki Bahin Scheme Benefits) मात्र, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत जमा झालेली रक्कम परत मागण्यात येणार नाही. कल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून हा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

पात्र महिलांसाठी योजनेचा लाभ सुरूच राहणार

लाडकी बहीण योजनेच्या अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना यापुढे लाभ नाही, मात्र इतर सर्व पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. सदर योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे जाहीर केले आहे.

लाडक्या बहिणींसाठी सरकारची मोठी भेट! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘रूपे कार्ड’ लाँच

फेब्रुवारी आणि मार्च हप्ता कधी जमा होणार? Ladki Bahin Yojana February Installment Date

Ladki Bahin Yojana February पैसे कधी जमा होणार? या प्रश्नाचे उत्तर आता खुद्द महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्यात येत आहे. पात्र महिलांच्या खात्यात सन्माननिधी जमा करण्याची प्रक्रिया दिनांक ७ मार्च २०२५ पासून सुरू झाली आहे. (Ladki Bahin Yojana 8th Installment Date)

अंगणवाडी भरती जाहिरात, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती

२१०० रुपयाचा हप्ता कधी पासून मिळणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तीन महिने उलटल्यानंतरही हा वाढीव हप्ता मिळालेला नाही. हा निर्णय नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

मार्च मध्ये महाराष्ट्र राज्याचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करण्याची शक्यता आहे. जर नवीन अर्थसंकल्पात याबाबत घोषणा झाली तर एप्रिल २०२५ पासून लाडकी बहीण योजनेचा सुधारित हप्ता लाभार्थ्यांना देण्यात येईल. मात्र अद्याप पर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लाडक्या बहिणींसाठी सरकारची मोठी भेट! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ‘रूपे कार्ड’ लाँच

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

निष्कर्ष

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, लाखो महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जात आहे. मात्र, काही अपात्र लाभार्थ्यांचा समावेश झाल्याने सरकारने योग्य पात्रता पडताळणी सुरू केली आहे.

पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळत राहणार असून त्यांची कोणतीही अडचण होणार नाही.
अपात्र ठरलेल्या महिलांना जानेवारी 2025 पासून योजनेचा लाभ मिळणार नाही, मात्र जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत मिळालेली रक्कम परत मागण्यात येणार नाही.

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे गरजू महिलांना योग्य आर्थिक मदत मिळू शकेल. सरकार महिलांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहील.

FAQ

पुढची लाडकी बहिन योजनेचे पैसे कधी येतील?

पुढची लाडकी बहिन योजनेचा आठवा आणि नववा हप्ता १२ मार्च पर्यंत जमा करण्यात येणार आहे. Ladki Bahin Yojana February Installment Date

माझी लाडकी बहिन योजनेचे मासिक पेमेंट किती आहे?

माझी लाडकी बहिन योजनेचे मासिक पेमेंट १५०० रुपये आहे.

महाराष्ट्रातील लाडकी बहिन योजनेची यादी कशी तपासायची?

लाडकी बहिण योजनेची ऑनलाईन यादी पाहण्यासाठी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल, त्यानंतर लाभार्थी यादी वर क्लिक करून तुमचा जिल्हा, तालुका निवडून आवश्यक माहिती सिलेक्ट करून यादीत नाव पाहता येईल. अधिक माहितीसाठी येथे भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!