मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता अखेर मिळणार! Ladki Bahin Yojana 8th Installment Date

By MarathiAlert Team

Updated on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana 8th Installment Date : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अखेर महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार 1500 रुपये

राज्यातील महिलांना Ladki Bahin Yojana फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणून 1500 रुपये मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ मिळाला होता.

मात्र, अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे सुमारे 9 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले, त्यामुळे यावेळी तुलनेने कमी महिलांना हा लाभ मिळेल. (Ladki Bahin Yojana February Installment)

‘या’ महिलांना पैसे मिळणार नाहीत!

लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी

आतापर्यंत मिळाले 10,500 रुपये, पुढील वाढीची प्रतीक्षा Ladki Bahin Yojana 8th Installment Date

या योजनेंतर्गत आतापर्यंत 7 हप्त्यांचे मिळून 10,500 रुपये लाभार्थींना मिळाले आहेत. आता (Ladki Bahin Yojana 8th Installment) 8व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाल्यावर एकूण रक्कम 12,000 रुपयांवर पोहोचेल.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, ८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा हप्ता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. (Ladki Bahin Yojana February Installment Date 2025)

महिला दिनाचे औचित्य साधत ५ ते ६ मार्चपर्यंत निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि ८ मार्च रोजी सर्व पात्र महिलांना त्यांच्या खात्यात सन्मान निधी मिळेल.

याशिवाय, ८ मार्च रोजी विधीमंडळाचे विशेष सत्रही आयोजित करण्यात येणार आहे, जे महिलांसाठीच समर्पित असेल. राज्य सरकार महिलांच्या सशक्तीकरणावर भर देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता कधी जमा होणार? त्वरित चेक करा

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana List Check Onlineलाडकी बहीण योजनेची यादी ऑनलाइन कशी तपासावी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी यादी ऑनलाइन पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या : ladakibahin.maharashtra.gov.in
  2. लॉगिन करा “लाभार्थी लॉगिन” मोबाईल नंबर किंवा अर्ज स्थिती वर क्लिक करा.
  3. आधार कार्ड क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून OTP/पासवर्डद्वारे लॉगिन करा.
  4. लॉगिन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना पर्याय निवडा.
  5. “लाभार्थी यादी पाहा” किंवा “अर्जाची स्थिती” पर्यायावर क्लिक करा.
  6. आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा अर्ज क्रमांक टाकून माहिती शोधा.
  7. यादी डाउनलोड करा (जर उपलब्ध असेल तर)
  8. जर जिल्हानिहाय किंवा गावानिहाय लाभार्थी यादी उपलब्ध असेल, तर तुमचा तालुका/गाव निवडा आणि यादी डाउनलोड करा.

 तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का हे तपासा

  • तुमच्या खात्यात ₹1500 जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी SMS द्वारे सूचना तपासा
  • जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल आणि तुमच्या खात्यावर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana 8th Installment) पैसे पाठवले असतील तर तुम्हाला SMS मिळेल. जो मोबाइल क्रमांक तुम्ही अर्ज भरताना दिला असेल, त्यावर चेक करा.
  • किंवा मोबाइल बँकिंग किंवा प्रत्यक्ष ATM, बँकेत जाऊन चेक करा.

2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन पूर्ण होणार का?

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांचे आता लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत विधानभवन, मुंबई येथे पार पडणार आहे. या अधिवेशनात पुढील वर्षाचा म्हणजेच एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या नवीन आर्थिक वर्षाचे बजेट मांडण्यात येणार आहे. यावेळी या बजेट मध्ये महिलांना 2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन पूर्ण होणार का? याबाबत राज्यातील महिलांचे लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. अधिक सविस्तर वाचा…

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

सारांश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठव्या हप्त्याची (फेब्रुवारी 2025) रक्कम (Ladki Bahin Yojana 8th Installment Date) अखेर पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी महिन्यात मोठ्या संख्येने महिलांना लाभ मिळाला असला, तरी अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे काही महिलांना यंदा हप्ता मिळणार नाही.

योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थींना एकूण 10,500 रुपये मिळाले असून, आता फेब्रुवारीच्या 1500 रुपयांचा समावेश झाल्यास हा आकडा 12,000 रुपयांवर जाईल. ८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा हप्ता थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. (Ladki Bahin Yojana Feb Installment Date)

महिला लाभार्थींना त्यांच्या खात्यात पैसे आले आहेत का, हे तपासण्यासाठी ऑनलाइन यादी पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, मोबाईल बँकिंग, एटीएम किंवा थेट बँकेत जाऊन देखील खात्री करता येईल.

योजनेत 2100 रुपये हप्ता देण्याचे सरकारचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याने राज्यातील महिलांचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!