Ladki Bahin Yojana Fund GR महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी २०२५-२६ आर्थिक वर्षाकरिता २९८४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. ३० जून २०२५ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार, हा निधी पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer – DBT) जमा केला जाणार आहे.
Ladki Bahin Yojana Fund GR
Ladki Bahin या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे, तसेच कुटुंबातील त्यांची भूमिका अधिक मजबूत करणे हा आहे.
योजनेचे स्वरूप आणि लाभार्थी: ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत, २१ ते ६५ वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलेला दरमहा १५०० रुपये थेट तिच्या बँक खात्यात मिळतील. तसेच, कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ देण्यात येतो.
निधी वितरण आणि आर्थिक तरतूद: २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी एकूण २८२९० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यापैकी, पहिल्या टप्प्यात २९८४ कोटी रुपये (अक्षरी: दोन हजार नऊशे चौरेऐंशी कोटी रुपये) वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी मागणी क्रमांक एक्स-१, लेखाशिर्ष २२३५ डी६३१ अंतर्गत ३१-सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर) या उद्दिष्टाखाली (सर्वसाधारण घटकांसाठी) वितरित करण्यात येत आहे.
अंमलबजावणी आणि नियंत्रण: या योजनेच्या खर्चासाठी महिला व बाल विकास विभागाचे उप सचिव (का-२) हे “नियंत्रण अधिकारी” असतील, तर महिला व बाल विकास विभागाचे कक्ष अधिकारी (रोख शाखा) हे “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून काम पाहतील. वितरीत केलेला निधी आहरण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा (VPDA) प्रणालीद्वारे योजनेच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात (क्रमांक ४३८००८४५६४३) जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा