Ladki Bahin Yojana July Installment “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने रु. ४१०.३० कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी पात्र महिलांना थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हस्तांतरित (Direct Benefit Transfer) केला जाईल.
योजनेची उद्दिष्ट्ये आणि स्वरूप:
- राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे.
- महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे.
- कुटुंबामध्ये महिलांची भूमिका अधिक मजबूत करणे.
- या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला दरमहा रु. १,५००/- मिळण्यास पात्र आहेत.
निधी वितरण प्रक्रिया:
- हा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे.
- महिला व बाल विकास विभागाचे उप सचिव (का-२) हे “नियंत्रण अधिकारी” असतील.
- कक्ष अधिकारी (रोख शाखा) हे “आहरण व संवितरण अधिकारी” असतील.
- आहरण व संवितरण अधिकारी यांनी हा निधी योजनेच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात VPDA प्रणालीद्वारे जमा करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.
- हा वितरित निधी २०२५-२६ या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी असलेल्या तरतुदींमधून खर्च करण्यात येईल.
Ladki Bahin Yojana July Installment साठी तरतूद मंजूर झाली असून, आता लवकरच जुलै महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय वाचा