NMMS सराव प्रश्नपत्रिका PDF 2025 (सर्व माध्यम)

Published On: November 30, 2025
Follow Us
NMMS Question Paper In Marathi PDF

NMMS Question Paper in Marathi PDF : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS Scholarship Exam) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी NMMS Question Paper in Marathi PDF तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर डाउनलोड करू शकता.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप

केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली) २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे.

  1. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक २८ डिसेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
  2. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

NMMS सराव प्रश्नपत्रिका PDF 2025 (सर्व माध्यम) | NMMS Question Paper In Marathi PDF

NMMS Question Paper In Marathi PDF

NMMS Question Paper In Marathi PDF  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२४-२५ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) खाली दिलेल्या माध्यम आणि विषयनिहाय तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर डाउनलोड करू शकता.

NMMS प्रश्नपत्रिका संच व उत्तरसूची (Answer Key) Download

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2023-24

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2023-24

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2022-23

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2021-22

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2020-21

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2019-20

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2018-19

NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2015-16-17

NMMS Hall Ticket Released Download : mscepune in Download Link Here

एनएमएमएस प्रश्नपत्रिका स्वरूप | NMMS Question Paper

NMMS Exam Question Paper Time Table

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

१) विषय : सदर परीक्षेसाठी २ विषय असतील

  • पेपर – १ ला :- बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
  • पेपर २ रा :- शालेय क्षमता चाचणीः ही सामान्यतः इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण – ३५) ३. गणित (एकूण गुण – २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषयांवर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

  • सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.
  • समाजशास्त्र ३५ गुण इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
  • गणित २० गुण.

२) एनएमएमएस प्रश्नपत्रिका माध्यम

  1. परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.)
  2. विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल.
  3. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे.
  4. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
  5. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : https://2025.mscenmms.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment